Raj THackeray , Balasaheb Thackeray Birth Anniversary
Raj THackeray , Balasaheb Thackeray Birth Anniversary  Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thackeray Jayanti : ''जा लढ,मी...!''; मनसेकडून 'तो' व्हिडीओ टि्वट करत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

सरकारनामा ब्यूरो

MNS News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या जयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून ठाकरेंना अभिवादन करण्यात येत आहे. तसेच ठाकरे गट व शिंदे गट यांच्याकडूनही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचदरम्यान मनसेकडूनही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अनोख्या पध्दतीनं अभिवादन करण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेंसह आमदार, खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट तयार झाले आहे. दोन्ही गटाकडून एकमेकांवर होत असलेल्या कुरघोडी व टीकेनं त्यांच्यातला वाद निवळण्याऐवजी पेटतच चालला आहे. याचवेळी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उध्दव ठाकरे यांच्यातला संघर्षही धगधगताच राहिला आहे.

मध्यंतरी राज यांच्याकडून उध्दव ठाकरेंच्या आजारपणावरही बोचरी टीका करण्यात आली आहे. पण आता बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मनसेनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सोमवारी(दि.२३) एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष सोडताना राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या अखेरच्या भेटीत नेमकं काय घडलं याचा उलगडा या व्हिडीओतून करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओत राज ठाकरेंनी शिवसेनेमधून जे जे बाहेर पडले त्यांच्या बंडामागील हेतूही सांगितला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेनं जो एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याला 'जा लढ, मी आहे... काही मूक संवादांमध्ये प्रचंड अर्थ दडलेले असतात... राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांशी अखेरचा 'राज'कीय संवाद !' असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ मनसेनं टि्वट केल्यानंतर काहीच वेळात सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी बाळासाहेब व राज यांच्यात बंददाराआड काही वेळ चर्चा झाली होती. त्यानंतर मनसे (MNS) पक्ष स्थापन झाला, या पक्षासह राज ठाकरेंनी यश अपयश दोन्हीही अनुभवलं पण या वाटचाली दरम्यान त्या भेटीविषयी राज यांनी कधीही जाहीर भाष्य केलं नव्हतं. पण मध्यंतरी राज यांनी मनसेच्या एका कार्यक्रमात बोलताना बाळासाहेबांसोबतच्या त्या अखेरच्या भेटीवर भाष्य करत त्या भेटीत नेमकं काय घडलं होतं याचा खुलासा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT