Gajanan Kale On Sushma Andhare: सुषमा अंधारेंवर टीका करताना मनसे नेत्याची जीभ घसरली; म्हणाले, ''ही काळी मांजर...''

MNS News : संजय राऊत असो की सुषमा अंधारे असो आता हा पक्ष संपणारच आहे...
Gajanan Kale, Sushma Andhare
Gajanan Kale, Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे भाजप, शिंदे गट आणि मनसेतील नेतेमंडळींवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता मनसेकडूनही अंधारे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पण ही टीका करताना मनसे नेत्याची जीभ घसरली आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी सुषमा अंधारेंना थेट काळी मांजर म्हटल्यानं राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमामध्ये गजानन काळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे, खासदार संजय राऊत दीपाली सय्यद यांच्यावर बोचरी टीका केली आहे. काळे यांनी अंधारेंवर निशाणा साधताना ती काळी मांजर सारखं आडवी जाते अशी टीका केली आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊत असो की सुषमा अंधारे असो आता हा पक्ष संपणारच आहे आणि या पक्षात आता उरलेसुरले दोघं बापलेकच राहणार असल्याचे दिसून येणार आहे अशी बोचरी टीकाही गजानन काळे(Gajanan Kale) यांनी केली आहे.

Gajanan Kale, Sushma Andhare
Shivsena News: बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे जाणार का?

मुख्यमंत्र्यांच्या काळात कुठल्या क्षेत्रात घोटाळा झाला नाही असं नाही...

कोरोना काळात अडीच वर्षे घरात बसून, फेसबूक ऑनलाईन करून देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री पदाचा पुरस्कार घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या काळात कुठला क्षेत्रात घोटाळा झाला नाही असं नाही. सगळ्या क्षेत्रात यांचा घोटाळा अगदी उंदीर मारण्यातही यांनी घोटाळा करत ठाकरे गटावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

बारामतीची चाटूगिरी करून संजय राऊत यांनी राजकीय प्रवास केला आहे. राऊत हे महाविकास आघाडीच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीवर प्रचंड टीका करत होते. याचवेळी ते दिल्लीत जाऊन मात्र शरद पवार यांच्याच बंगल्यावर जाऊन भेटत घेत होते. शरद पवारांनी टीका करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये खासदार संजय राऊत ठेवले होते. आता त्यांना शांत बसवून या असा हल्लाबोल देखील काळे यांनी संजय राऊतांवर केला आहे.

Gajanan Kale, Sushma Andhare
Abu Azami News: महाराष्ट्राचं नाव बदला : आमदार अबू आझमींची मागणी! "रायगड नावालाही काही अर्थ नाही.."

सुषमा अंधारे यांना राष्ट्रवादीचे पार्सल तर दीपाली सय्यद यांना सय्यद बंडा म्हणत डिवचलं आहे. यामुळे आगामी काळात गजानन काळे यांच्या टीकेला राष्ट्रवादी व ठाकरे यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com