Mangal prabhat Lodha-Varsha Gaikwad Sarkarnama
मुंबई

Mumbai News : मुंबई पालिकेत पालकमंत्र्यांचा ‘जनसमस्या निवारण कक्ष’ सुरूच राहणार; मंगलप्रभात लोढांनी विरोधकांना ठणकावले

आम्ही मुंबई महापालिकेत समस्या निवारण कक्ष उभा केला, तर त्यामध्ये विरोधकांना काय अडचण आहे. त्यांनाही निमंत्रण आहे, त्यांनीही त्या दालनात यावं.

सरकारनामा ब्यूरो

Assembly Session News : नागरी क्षेत्रातील झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ सुधारणा विधेयकावर चर्चेत भाग घेताना काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या महानगरपालिकेतील दालनावर बोट ठेवले. त्यावर मंत्री लोढा यांनी हरकतीचा मुद्दा मांडत उत्तर दिले. मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्यांच्या दालनाचा गेल्या सात दिवसांपासून वाद सुरू आहे. त्या ठिकाणी एकही राजकीय काम होणार नाही. फक्त लोकांची समस्या ऐकून घेतली जाणार आहे. तो जनसमस्या निवारण कक्ष सुरूच राहील. पण, पालकमंत्र्याने मोठा बंगला दिला होता, त्यात त्यांचा काय हेतू होता, असा सवाल लोढा यांनी गायकवाड यांना केला. (Guardian Minister's 'Public Problem Redressal Cell' will continue in Mumbai corporation : Mangal prabhat Lodha)

विधानसभेत आज महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम १९७५ सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. त्यावर आमदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) बोलत होत्या. वृक्ष प्रााधिकरणाच्या माध्यमातून बिल्डरधार्जिणी धोरणं केली जातात. मोठमोठ्या लोकांना मदत करणारी धोरण केली जातात. विक्रोळीत मोठ्या प्रमाणात झाडे होती. त्या झाडांवर ॲसिड टाकलं जायचं. औषधं टाकून त्या झाडांना हळूहळू मारलं जायचं. त्या बदल्यात आपण किती झाडे लावली आहेत. लोकांनी किती झाडे तोडली, त्या ठिकाणी किती झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली हेाती.

दिल्लीत थोडी तरी ग्रीनरी आहे. पण मुंबईची काय परिस्थिती आहे. मुंबईत आहे का ग्रीनरी? मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्याचे काम हेात आहे. आपण रस्त्यात जिथं जागा आहे, त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम करत आहोत. पण त्याठिकाणी झाडं लावण्याची गरज आहे, असेही गायकवाड यांनी सूचविले.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महापालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. कोण मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळात कारभारात हस्तक्षेप झाला. मुंबई महापालिकेची स्वायतत्ता टिकली पाहिजे. पण आता पहिल्यांदा असं झालं आहे की मुंबई महापालिकेत पालकमंत्र्यांचं कार्यालयत झाले आहे. त्यानंतर माजी नगरसेवकांची यादी जाहीर झाली. त्या ठिाकणी माझी नगरसेवकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली, तेही एकाच पक्षाच्या माजी नगरसेवकांची बसण्याची व्यवस्था झाली.

मागील काळात जयंत पाटील, सुरेश शेट्टी आणि इतर अनेक मंत्री मुंबईचे पालकमंत्री हेाते. पण कुणाच्या काळात मुंबई महापालिकेत कोणाचेही दालन झाले नाही. पण ते सधाच्या पालकमंत्र्यांच्या काळात झाले आहे, असे आमदार गायकवाड यांनी नमूद केले.

मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal prabhat Lodha) यांनी गायकवाड यांच्या मुद्यावर हरकत घेतली. ते म्हणाले की, पालकमंत्र्यांच्या मुंबई महापालिकेतील दालनाचा गेल्या सात दिवसांपासून वाद सुरू आहे. पालकमंत्री मागच्या वेळी हेाते. मात्र, या वेळी पालकमंत्र्याशिवाय कोणीही लोकप्रतिनिधी पालिकेत येत नाही. जनतेची समस्या प्रत्येक विभागात असते. क्षेत्रीलय कार्यालयात फक्त वॉर्डातील कामे असतात. मुख्य कार्यालयात कोणीही वॉर्डातील लोक येऊ शकत नाहीत. मंत्रालयात परवानगीशिवाय जाऊ शकत नाहीत.

आता आम्ही मुंबई महापालिकेत समस्या निवारण कक्ष उभा केला, तर त्यामध्ये विरोधकांना काय अडचण आहे. त्यांनाही निमंत्रण आहे, त्यांनीही त्या दालनात यावं. त्या ठिकाणी एकही राजकीय काम होणार नाही. त्या ठिकाणी फक्त लोकांची समस्या ऐकून घेतली जाणार आहे. त्या ठिकाणी पालकमंत्र्यांचे जनसमस्या निवारण कक्ष सुरूच राहणार आहे, अशा शब्दांत लोढा यांनी विरोधकांना आव्हान दिले. तसेच, एका पालकमंत्र्याने मोठा बंगला दिला होता, त्यात त्यांचा काय हेतू होता, असा सवालही केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT