Mumbai News : मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर विधानसभेत आरोप-प्रत्यारोप रंगले. काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांना डबल इंजिनचे ट्रीपल इंजिन झाल्यावरून चिमटे काढले. तसेच, ‘शासन आपल्या दारी’वर टीका केली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थोरातांचा निषेध करत विरोधी पक्षनेता आजपर्यंत का नेमला नाही, असा सवाल विरोधकांना केला. तर आमदार नाना पटोले यांनी सहा-सहा जिल्ह्यांत एकच पालकमंत्री का आहेत,’ असा सवाल करत सरकारला धारेवर धरले. (Congress-BJP questions and answers in the assembly)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निवेदनावर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशन उपस्थित करत सत्ताधारी पक्षाला चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांचे निवेदन हे मुक्तछंद होते. डबल इंजिनचे ट्रीपल इंजिन झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण, संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय की कोणतं इंजिन कुणाला ढकलतंय आणि त्या गाडीचं काय होणार, असा चिमटा काढला.
मुख्यमंत्री हे राज्याचे कुटुंबप्रमुख असतात आणि त्यांनी घरातील व्यक्तीशी भेदभाव करायचा नसतो. पण येथे भेदभाव दिसत आहे. राज्य सरकारने ‘शासन आपली दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. पण त्यात अनुभव वाईट येत आहेत. सहा महिन्यांपासून प्रमाणपत्रं रोखून धरली आहेत. माझ्या मतदारसंघातील सर्व प्रमाणपत्रं रोखून ठेवलेली आहेत, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या संदर्भातील बाळासाहेब थोरात तुमच्या काय तक्रारी आहेत, त्या द्या. तुमच्या मतदारसंघातील सगळ्या तक्रारी दूर करतो. बाळासाहेब तुमचा शासन आपल्या दारी या उपक्रमाला विरोध आहे का, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही विरोधकांना सुनावले. शेतकरीहिताचे निर्णय मुख्यमंत्री जाहीर करत असताना बाळासाहेब थोरात यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केले, त्याचा निषेध सभागृहाने केले पाहिजे. माझाही पॉईंट ऑफ इन्फर्मेशन आहे, अध्यक्ष. विरोधी पक्षनेता आजपर्यंत जाहीर का झालेला नाही. विरोधी पक्षनेता जाहीर न करता सरकारच्या निर्णयाला विरोध करणे, हे लोकशाहीला धोक्याची घंटा आहे. हे राज्यातील जनतेने ओळखून घेण्याची गरज आहे, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
नाना पटोले (Nana Patole) यांनीही ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’च्या द्वारे सरकारला धारेवर धरले. वनमंत्री मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षाचा नेता उपस्थित केला नाही, असा मुद्दा उपस्थित केला आहे. माझा मुद्दा असा आहे की, सहा-सहा जिल्ह्यात एकच पालकमंत्री आहेत. (सत्ताधारी पक्षाकडून सक्षम आहे, असे उत्तर दिले, त्यालाही पटोले यांनी उत्तर देत आम्हीही सक्षम असल्याचे स्पष्ट केले) अवकाळी पावसात आमचा पालकमंत्री पोचू शकला नाही. आज महाराष्ट्रात भयानक परिस्थिती आहे. असे असताना सत्ताधारी पक्षाला आरोप लावण्याचा काय अधिकार आहे. त्यांनी सरकार म्हणून आपलं सांगावं ना?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.