Gulabrao Patil, Abdul sattar, Bhaskar jadhav Latest News
Gulabrao Patil, Abdul sattar, Bhaskar jadhav Latest News Sarkarnama
मुंबई

गुलाबराव पाटील, सत्तारांना भाजपच्या संगतीने वाण नाही पण गुण लागला...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप-पत्यारोपांची जणू स्पर्धाच लागली आहे. यामुळे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची नेते एकमेकांना राजकीय सुसंस्कृतपणाची नव्याने आठवणं करून देत आहेत. मात्र, पुन्हा पन्हा तशाच प्रकारे वक्तव्य येत आहे.

दरम्यान, राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मंत्री गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार आणि भाजपवर टीका केली आहे. त्यांना आज नवी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. (Gulabrao Patil, Abdul sattar, Bhaskar jadhav Latest News)

गुलाबराव पाटीलांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा 'नटी' असा केलेला उल्लेख, त्यानंतर सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेली टीका यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर धारेवर धरले असून या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान भास्कर जाधव यांनी या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यावर टीका करतांना त्यांचा बोलवता धनी भाजप असल्याची टीका करत त्यांना भाजपच्या संगतीत वाण नाही पण गुण लागला, अशा शब्दात त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

भास्कर जाधव म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभ्या असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर सुडबुद्धीने सत्ताधाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. मात्र सत्ताधारी पक्षातील लोकांवर तशी कारवाई केली जात नाही. आमचे पदाधिकारी मडवींना देखील अशाचप्रकारे जाणीवपूर्वक तडीपार केलं गेलं. म्हणूनच त्याला विरोध म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढला होता. मात्र, त्यानंतरही आमच्या लोकांविरोधात गुन्हे दाखल झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर माझ्यावर दोन गुन्हे वाशी पोलीस स्टेशनवर दाखल्यामुळे मी इथे आलो असल्याचे जाधवांनी यावेळी सांगितले.

पुढे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, मागील गेली अडीच ते तीन वर्ष भाजपा नेते आणि त्यांचे सहयोगी सदस्य कशी वक्तव्य करत आहेत हे देखील तपासून पाहायला हवे. त्यांच्या नेत्यांनी अनेकदा केलेली वक्तव्य अश्लाघ्य आणि निषेधार्ह आहेत. यामध्ये आता त्यांच्या बाजूला शिंदे गट जाऊन बसला.

शिंदे गटात जाण्यापुर्वी गुलाबराव आणि सत्तारांवर उद्धव ठाकरेंच्या सुसंस्कृतपणाचा धाक होता. मात्र आता तो राहिलेला नाही. भाजप आपले विचार दुसऱ्याच्या तोंडून वदवून घ्यायचा प्रयत्न करत असते. म्हणूनच वाण नाही पण गुण लागल्याची टीका त्यांनी केली. शब्द जरी गुलाबराव आणि सत्तारांचे असले, तरी भाजपाचेच शब्दप्रयोग केला जात आहे, अशा शब्दात जाधवांनी भाजपला (BJP) देखील डिवचलं.

दरम्यान, संजय राऊत यांचा जामीन मंजूर करताना पीएमएलए कोर्टानं ईडीवर ओढलेले ताशेरे हे केंद्र सरकारवरही असल्याचं म्हणतं जाधवांनी भाजपला लक्ष केलं. आम्हाला अनेक प्रकारचा मानसिक त्रास झाला मात्र यातून तरी ईडी आणि केंद्र सरकारचे डोळे उघडतील आणि भविष्यात अशाप्रकारे कुणाला उगीच बेकायदेशीरपणे अटक होऊ नये, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT