तीस पदाधिकाऱ्यांनी ठाकरे-पवारांची साथ सोडली अन् सावंतांनी विरोधकांना ललकारले...

Tanaji Sawant : विरोधक औषधालाही उरणार नाहीत.
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Tanaji Sawant,CM Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray, Ajit Pawar, Tanaji Sawant,CM Eknath Shinde Latest NewsSarkarnama

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील उद्धव ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मधील तालुका प्रमुख संजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राजीनामा दिला होता. दरम्यान, बुधवारी (ता.९ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री तानाजी सावंत संपर्क प्रमुख शिवाजी सावंत जिल्हाप्रमुख मनिष काळजे,अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी तीस पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश केला. (Uddhav Thackeray, Ajit Pawar, Tanaji Sawant,CM Eknath Shinde Latest News)

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Tanaji Sawant,CM Eknath Shinde Latest News
Vidarbha : कॉंग्रेसचे चार माजी आमदार जाणार शिंदेसेनेत, युवा सेनेलाही खिंडार...

यामध्ये तालुकाप्रमुख संजय देशमुख, शहर प्रमुख योगेश पवार, तालुका उपप्रमुख प्रा. सुर्यकांत कडबगावकर, उपप्रमुख सैपन पटेल, महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षा चव्हाण, शहरप्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुंभार, शहर उपप्रमुख महिबुब शेख, राहुल चव्हाण, तेजस झुंजे, युवासेना शहरप्रमुख विनोद मदने, प्रसिद्धी प्रमुख बसवराज बिराजदार, खंडु कलाल, विभाग प्रमुख उमेश पांढरे,समीर शेख, बसवराज कोळी, तानाजी मोरे, खंडेराया शिंदे.

तसेच, शिक्षक सेना तालुकाप्रमुख प्रा इरण्णा धानशट्टी, व्यापारी सेना तालुका प्रमुख मल्लिनाथ पाटील व सिध्दाराम कलशेट्टी, कामगार सेना तालुकाप्रमुख शिवानंद कोळी, भाजपाचे माजी नगरसेवक चंद्रकांत वेदपाठक, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष सिध्दाराम जाधव, रोहित पवार विचार मंच तालुका प्रमुख पुष्कर सलगरकर, सचिव रवी नारायणकर, ग्रामपंचायत सदस्य रवी गायकवाड यानी बाळासाहेब शिवसेनेत प्रवेश केला.

Uddhav Thackeray, Ajit Pawar, Tanaji Sawant,CM Eknath Shinde Latest News
Bharat Jodo : इंदिरा गांधींचा नातू पाहिला गं बाई..

दरम्यान, यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले,संपुर्ण महाराष्ट्रातुन अनेकजण बाळासाहेबांची शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहेत. विकास हाच आमचा अजेंडा आहे. तर जनतेच्या हिताचे कामे करुन अक्कलकोट तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी उिपलब्ध करून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी दिला.

तर आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यावेळी म्हणाले, विरोधक औषधालाही उरणार नाहीत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉग्रेस नावालाही उरणार नाही, अशा शब्दात सावंतांनी विरोधकांना ललकारले.

तसेच कार्यकर्त्यांची कोणतेही कामे मागे पडु देणार नाही, त्यासाठी संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या सपंर्कात रहा, असेही सावंतांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com