Adv Gunaratna Sadavarte News : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईकडे कूच करणार आहेत. 29 ऑगस्टला ते मुंबईतील आझाद मैदानाता आंदोलन करणार आहेत. आंदोलनाचा मार्ग देखील निश्चित झाला आहे. मात्र, ते मुंबईला निघण्याआधीच अॅड. गुणरत्न सदावर्ती यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे.
मनोज जरांगे पाटील यांना मुंबई येऊ देऊ नका, यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस महासंचाल, मुंबई पोलिस आयुक्त यांना पत्र लिहिले आहे. तसेच ते आझाद मैदानात पोलिस ठाण्यात जरांगेंच्या विरोधात तक्रार देणार आहेत.
सदावर्ते म्हणाले, 'हितसंबंधासाठी, राजकीय कारणांसाठी जी लोकं पुढे येतायेत त्यांना थांबवण्याची गरज आहे. संविधानाने, सु्प्रीम कोर्टाने, हायकोर्टाने निकाल दिला असेल उच्च न्यायालयाने दिला असेल तर त्या निकालाच्या विरोधात कोणालाही जात येत नाही. तर कोर्टाचा अवमान होतो. हेच जरांगेला हेच सांगायचे आहे.'
'दंगल घडवण्याचा प्रयत्न होईल, असे म्हणून दंगलीची भाषा जरांगेच बोलत आहे. धार्मिक तेढ आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जमलं तसं घुसा, ही कोणती भाषा करत आहे. जरांगे राजकारणासाठी सरकाराला ब्लॅकमेल करत आहे.', असे सदावर्ते म्हणाले. त्याच्यावर कारवाई केली नाही तर मी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेईल, असा इशारा देखील सदावर्ते यांनी दिला.
या देशात कायद्यापेक्षा मोठा नाही. जरांगे कायदा मोडत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो म्हणतोय की आम्ही शांततेत येऊ पण मुंबईतील रस्ते बंद करून मुंबई बंद पाडण्याचा डाव आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान करायचे आहे, असे देखील सदावर्ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.