Gunaratna Sadavarte, Udayanraje Bhosale Sarkarnama
मुंबई

Gunaratna Sadavarte : महात्मा फुलेंबाबत उदयनराजेंनी केलेल्या 'त्या' वक्तव्यावर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "संदर्भग्रंथ..."

Udayanraje Bhosale Controversy : महात्मा फुले यांच्या जयंती दिवशीच खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली होती आणि त्यांचं अनुकरण महात्मा फुलेंनी केलं होतं, असं वक्तव्य केलं होतं.

Jagdish Patil

Mumbai News, 13 Apr : महात्मा फुले यांच्या जयंती दिवशीच खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली होती आणि त्यांचं अनुकरण महात्मा फुलेंनी केलं होतं, असं वक्तव्य केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. अनेकांनी उदयनराजेंच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. तर काही नेत्यांनी टीका देखील केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजेंनी देशातील पहिल्या शाळेसंदर्भात केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आणि खोडसाळपणाचं असल्याचं म्हटलं होतं.

अशातच आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी उदयनराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "इतिहासाचा दाखला देताना अभ्यास करावा लागतो, संदर्भग्रंथ वाचावे लागतात, इतिहास माहिती असावा लागतो, असं सहज बोलून चालत नाही.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा अभ्यास आज जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये शिकवला जातो. 'अनुकरण' या शब्दाचा संदर्भ उदयनराजेंना माहितीआहे का? एकतर तुम्ही समोर येऊन सगळं नीट समजावून सांगा आणि जर तुम्ही हे करून शकत नसाल तर माफी मागितली पाहिजे."; अशा शब्दात त्यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, नुकतंच उदयनराजेंनी महापुरुषांबद्दल चुकीची वक्तव्य केल्यावरुन संताप व्यक्त केला होता. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कायदा केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र, नुकतंच त्यांनी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर त्यांनी महिलांच्या पहिल्या शाळेसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात आलेले उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले, "सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरू केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली. थोरले प्रतापसिंह महाराज यांचंच महात्मा फुलेंनी अनुकरण केलं.

स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली, ती देखील स्वत:च्या राजवाड्यात सुरु केली. त्याच शाळेत कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं."

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT