Anil Parab | Gunratna Sadavrte
Anil Parab | Gunratna Sadavrte Sarkarnama
मुंबई

परबांवरील ED छाप्यानंतर सदावर्तेंचा आनंद गगनात मावेना; पेढे वाटप करत म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

(Anil Parab ED Raid)

मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना प्रवक्ते अनिल परब (Anil Parab) यांच्या भोवती ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने कारवाईचा फास आवळला आहे. परब यांच्या शासकीय निवासस्थान शिवालय आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह एकूण सात ठिकाणी ईडीने आज सकाळी छापेमारी केली. आज सकाळी सहा वाजता ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहचले आहे. (Anil Parab latest news update)

ईडीने यापूर्वी महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर कारवाई केली आहे. नंतर ईडीनं अनिल परब यांच्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली होती. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर अनिल देशमुख यांनी आता कपड्याच्या बॅग तयार ठेवा," असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी या कारवाईनंतर माध्यमांना सांगितले.

या संपूर्ण कारवाईनंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी लाडू वाटून आनंद साजरा केला आहे. "ही तर कर्माची फळं, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वाण नाही पण गुण लागला" असे म्हणतं सदावर्ते यांनी परबांना लक्ष्य केले आहे. तसेच "एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी हे पद दुसऱ्याला द्यायला पाहिजे होतं. ही तर कर्माची फळं आहेत." असेही मत सदावर्ते यांनी व्यक्त केलं आहे.

"लवासा घोटाळा, सिंचन घोटाळा आणि आदर्श घोटाळा करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिल्यावर हा गुण लागणारच, वाण नाही पण गुण लागतोच. आता मनी लॉंडरिंग प्रकरणातील गुन्ह्याचीही उकल होणार आहे असा दावा सदावर्ते यांंनी केला. यावेळी सदावर्ते यांनी आनंद व्यक्त करत लाडूचे वाटप केले. हा आनंद व्यक्त करताना त्यांच्यासोबत अनेक एसटी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी या एसटी कर्मचाऱ्यांनीही एकमेकांना लाडू भरवून आनंद व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT