परबांवरील ईडी कारवाईनंतर राऊतांचा इशारा; म्हणाले,'आम्ही सुद्धा पाहून घेऊ'

" पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत," असे राऊत म्हणाले.
Sanjay Raut news
Sanjay Raut newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई :परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या निवासस्थानी ईडीनं (ED raids) छापामारी सुरु केली आहे, यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर हल्लाबोल केला आहे. (sanjay raut latest news)

"गेल्या काही दिवसापासून राजकीय सूडबुद्धीने अशा कारवाया सुरू आहेत , अनिल परब आणि आमच्या इतर सहकाऱ्यांवर आरोप केले जात आहेत.भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत, परंतु त्याला कोणी हात लावत नाही, आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत," असे राऊत म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, "अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, कॅबिनेटमंत्री आहेत, पक्षाचे कडवट शिवसैनिक आहेत. सूडाच्या आणि बदलाच्या भावनेने किती कारवाया केल्या तरी आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. महाराष्ट्रातल्या राजकारणाला इतका वाईट वळण गेल्या पंचावन्न वर्षात कधी मिळालं नव्हतं. सर्व निवडणुका सुरळीत पार पाडू, सरकार सुरळीत चालेल आणि अशा कारवायामुळेभाजप हा रोज खड्ड्यात जात आहे,"

Sanjay Raut news
संभाजीराजेंशी राऊत, देसाई, घडाघडा बोललेच नाहीत, नार्वेकरांनी विषयच संपविला!

"तुमच्या हातात केंद्रीय तपास यंत्रणा आहे, त्यामुळे राज्यातील राजकीय विरोधकांना अशाप्रकारे नामोहरण करावं असं कुणाला वाटत असेल तर शिवसेनेचे मनोबल किंबहुना महाविकास सरकारचा मनोबल अजिबात कमी होणार नाही, अशा प्रत्येक कारवायांमुळे आमचे मनोबल वाढत जाईल," असे राऊत म्हणाले.

"आमच्याकडे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांना विरोधात असंख्य पुरावे आहेत, जितू नवलानीला कोणी पळवलं याचे उत्तर सुद्धा सबळ पुरावे असणाऱ्यांनी द्यावे," असे राऊत यांनी सांगितले.

"महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधीलमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया या फक्त सूडबुद्धीने आणि सरकारला त्रास देण्यासाठी सुरू आहेत. फक्त शिवसेनेला त्रास द्यायचं, शिवसेनेला बदनाम करायचं, महाविकास आघाडीला कोंडीत आणण्यासाठी या संपूर्णपणे कारवाया सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून या कारवाया केल्या जात आहेत परंतु आमच्या मनोबलावर कोणताही परिणाम होणार नाही," असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut news
पूजा सिंघल यांचा मुक्काम आता रांचीच्या होटवार कारागृहात

"विक्रांत घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे मी मानतो, मी सातत्याने घोटाळा चे पेपर दिल्लीला देत आहेत परंतु त्यावर साधं उत्तर येत नाही. माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला म्हणून मी मागे हटणार नाहीत, मी इतर काही प्रकरण पाठवले आहेत, पण ती फाइल उघडून पाहण्याची तसदी देखील कोणी घेत नाही परंतु आम्ही देखील पाहून घेऊ," असा इशारा राऊतांनी दिला.

राज्यसभा उमेदवारी

शिवसेनेच्या दोन उमेदवार मी स्वतः आणि कोल्हापूरचे संजय पवार आज एक वाजता राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com