Haji Mastan’s Daughter Haseen Mastan Mirza Video Goes Viral: Sarkarnama
मुंबई

Haseen Mastan Mirza: डॉन हाजी मस्तानच्या कन्येची मोदी-शहांना साद; Video व्हायरल; हसीन मस्तान मिर्जाला रडू कोसळलं

Haji Mastan’s Daughter Haseen Mastan Mirza Video Goes Viral:मी थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे मदतीने मागणी केली आहे. आम्ही महिला आमच्या न्याय-हक्कासाठी अनेक वर्षापासून लढा देत आहोत. आता आमचे म्हणणे हे देशाच्या नेत्यांकडे पोहचणे गरजेचे आहे, असे तिने म्हटले आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: डॉन हाजी मस्तान याची कन्या हसीन मस्तान मिर्जा हीने एक भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भावनिक साद घातली आहे. यावर नेटकऱ्यांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या प्रलंबित खटल्यात मोदी आणि शाह यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी तिने केली आहे.

एका जुन्या प्रकरणाबाबत हसीन हीने मोदी-शाह यांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला न्याया मिळावा, अशी मागणी तिने केली आहे. या प्रकरणावरुन मी अनेक दिवसापासून बोलत आहे, पण माध्यमांच्यानी ही गांभीर्याने घेतली नाही. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

माझ्या याबाबत कुणाचा पाठिंबा मिळाला नाही, कुठल्याही व्यासपीठावर माझ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली नाही. त्यामुळे मी थेट नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याकडे मदतीने मागणी केली आहे. आम्ही महिला आमच्या न्याय-हक्कासाठी अनेक वर्षापासून लढा देत आहोत. आता आमचे म्हणणे हे देशाच्या नेत्यांकडे पोहचणे गरजेचे आहे, असे तिने म्हटले आहे.

माझ्यावर बलात्कार झाला आहे...

आपल्या वडिलांच्या उल्लेख करीत हसीन म्हणाली,"तुम्ही सर्वांना न्याय दिला. आता हे जग तुमच्या मुलीला न्याय देईल," या व्हिडिओमुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हसीन सध्या आपल्या वडीलांच्या संपत्तीबाबत न्यायालयीन लढाई लढत आहे.

आपल्यावर बलात्कार आणि खूनाच्या प्रयत्न झाल्याचा दावा तिने केला आहे. देशातील कायद्यांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप तिने केला आहे. तिने दाखल केलेल्या खटल्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. आपल्या देशाचे कायदे कठोर असते तर गुन्हेगारांवर वचक राहिल, गुन्हा करण्यापूर्वी ते दोन वेळा विचार करतील.

शेवटपर्यंत लढा सुरू ठेवेन

व्हिडिओच्या शेवटी, हसीन म्हणते की ती एकटीच आली आहे आणि एकटीच जाईल, परंतु माझ्या न्याय- हक्कांची लढाई शेवटपर्यंत लढेल. हे प्रकरण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहे. तिचे मोदी-शहांना केलेले आवाहनानंतर सरकारच काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT