Har Har Mahadev Movie Controversy
Har Har Mahadev Movie Controversy sarkarnama
मुंबई

Har Har Mahadev Movie: ‘हर हर महादेव’ वाद चिघळणार ? ; बाजी प्रभू देशपांडेंच्या वंशजांचा आक्षेप

सरकारनामा ब्युरो

Har Har Mahadev : छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आधारित असलेला ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट सध्या वादात सापडला आहे. या चित्रपटाविरोधात आंदोलनं केली जात आहेत. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या कथेत इतिहासात (Shivaji Maharaj History) छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या वादाबाबत बाजी प्रभू देशपांडे यांच्या वंशज प्रा. रुपाली देशपांडे यांनी भाष्य केलं आहे. (Har Har Mahadev Movie Controversy news update)

'हर हर महादेव' या चित्रपटावर झालेल्या टीका आम्ही पाहिल्या आहेत. आम्ही स्वतः हा चित्रपट पाहिला आहे. 'सिनेमॅटिक लिबर्टी'च्या नावाखाली जे दाखवले आहेत त्यातील काही गोष्टींचा आम्हाला आक्षेप आहे," असे रुपाली देशपांडे म्हणाल्या. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

"आम्हाला चित्रपटाच्या टीममधून कोणीही हा सिनेमा दाखवला नाही. चित्रपटाला आमचा विरोध नाही पण यातील काही सिनबद्दल आम्हाला आक्षेप आहे. याबाबत आम्ही कारवाई करण्याच्या विचारात आहोत, पण आधी आम्ही संवाद करण्याचे ठरवले आहे. त्यांना कायदेशीर अर्ज देणार आहोत. बांदल यांच्याशी देखील संपर्क करू," असे देशपांडे यांनी सांगितले.

याविरोधात पुण्यासह मुंबईमध्ये देखील आंदोलनं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर थिएटरमध्ये जाऊन हर हर महादेव या चित्रपटाचा शो बंद पाडला होता. मात्र नंतर मनसेकडून हा शो पुन्हा सुरु करण्यात आला.

बाजी प्रभू देशपांडे यांच्या वंशज प्रा. रुपाली देशपांडे यांनी घेतलेले आक्षेप

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख जो बाजी प्रभू यांनी चित्रपटात केला आहे तो एकेरी आहे. हे चुकीचे आहे

  2. शिरवळमध्ये नदी आहे तिथे इंग्रज, समुद्र नाही आणि तिथे इंग्रजांचे प्राबल्य देखील नव्हते.

  3. बाजीप्रभू आणि फुलाजी सख्खे भाऊ पण दोघांमध्ये एक तंटा दाखवला आहे त्याला विश्वासघात असा उल्लेख म्हणून दाखवला आहे. एक असा सिन त्यांच्या मध्ये भांडण होईल असे दाखवले आहे पण हे असं नाही.

  4. अफजल खानाचा जेव्हा वध झाला त्या ठिकाणी बाजीप्रभू हजर नव्हते, तेही चित्रपटामध्ये दाखवले आहे.

  5. बांदल देशमुख आणि बाजी प्रभू यांच्यातील वाद देखील खटकला आहे.

  6. अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी देवळे पाडण्याचे आमिष दाखवून आणले गेले असे दाखवले आहे. हे इतके सोपे नव्हते आणि देऊळ हे आपले श्रद्धा स्थान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT