Sanjay Raut Sanjay Pande Bjp  Sarkarnama
मुंबई

Mumbai News : "अडीच वर्षांत घराबाहेर पडले नाही..." ; भाजपच्या उत्तर भारतीय नेत्याने ठाकरेंना डिवचलं!

Sanjay Raut : क्या तुम भी संजुभाऊ? म्हणत संजय राऊतांवरही निशाणा.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. योगींच्या मुंबईत नियोजित रोड शोच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नते संजय राऊत यांनी योगींवार निशाणा साधला होता, यावर भाजपकडून ही प्रत्युत्तर देण्यात आलंय.

शिवसेनेच्या या टिकेनंतर आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष यांनी शिवसेना आणि राऊतांवर हल्लाबोल केला आहे. पांडे म्हणाले, "उरली सुरली शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, योगींचा रोड शो कशासाठी?आता राऊतांना काय समजणार रोड शो? अशा शब्दात पांडे यांनी टिका केली.

यासोबतच पांडे यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. "जे अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर पडले नाही.यांच्यासाठी एकच रोड-शो होता, तो म्हणजे वर्षा ते मातोश्री, तोही ऐन कोरोना काळात झालेला. ते ही मुख्यमंत्रीपद गेल्यावर त्यांनी रोड शो केला. घरात बसणारे बाहेर फिरणार्‍यांवर टीका करतात तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. क्या तुम भी संजुभाऊ? असे म्हणत त्यांनी जोरदाक टीका केली.

योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमध्ये एक पुन्हा टीका टिप्पणीचे नवे सत्र सुरू झाले आहे. यावर दोन्ही पक्षात आणखीही वाद - विवाद होण्याची चिन्हे दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT