Maharashtra Bhavan : योगी आदित्यनाथांकडून मुख्यमंत्री शिंदेंना मिळाले मोठं गिफ्ट

Eknath Shinde : योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायची तयारी दर्शवली आहे.
Eknath Shinde, yogi adityanath
Eknath Shinde, yogi adityanathsarkarnama

Eknath Shinde : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी अयोध्येत भव्य असे ‘महाराष्ट्र भवन’ बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी केली होती. आता अयोध्येत महाराष्ट्र भवन (maharashtra bhavan) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत योगी आदित्यानाथ यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यास तत्वतः मंजुरी दिली आहे.

Eknath Shinde, yogi adityanath
Nitesh Rane's Angry Reaction : अजितदादांनी 'टिल्ल्या' म्हटल्याने नितेश राणे संतप्त ; टि्वट करुन दिलं 'हे' उत्तर

अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारलं जावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी काही दिवसापूर्वी योगी आदित्यनाथ यांना निवेदन दिलं होत. लवकरच अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारलं जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली होती. कालच्या (बुधवारी) भेटीनंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायची तयारी दर्शवली आहे.

Eknath Shinde, yogi adityanath
Deven Bharti : फडणवीस हे समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करताहेत ; देवेन भारतींच्या नियुक्तीवर काँग्रेसचा आक्षेप

योगी आदित्यनाथ यांच्या स्नेहभोजनाचे आयोजन राजभवनात करण्यात आले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, खासदार रवी किशन उपस्थित होते. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एकनाथ शिंदेंना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्या दौऱ्यावर येण्याचे निमंत्रण दिले आहे.

"महाराष्ट्र आणि उत्तर भारत यांची संस्कृती एकमेकांमध्ये मिसळून गेली आहे. तुम्हीही इथे आल्यानंतर महाराष्ट्रातलेच झाला आहात. लवकरच सगळया आमदारांना घेऊन अयोध्येला जाणार आहोत तिथे प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहोत," असे शिंदे यांनी काही दिवसापूर्वी सांगितले आहे.

Eknath Shinde, yogi adityanath
Solapur : सरपंचाचे एक मत ठरणार महत्वाचे ; उपसरपंचाची निवड अशी होणार

योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी टोला हाणला आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

"योगी आदित्यनाथ असो किंवा अन्य कोणी असो त्यांच्यामुळे मुंबईची शान काही कमी होणार नाही," अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी योगी आदित्यनाथांना सुनावलं आहे. "मुंबई मराठी माणसाची आहे," असे आव्हाड म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com