Ajit Pawar-Uddhav Thackeray

 
sarkarnama
मुंबई

`मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे, हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?`

विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली पत्रकार परिषद

ज्ञानेश सावंत

पुणे : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या (Assembly Winter Session) पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जोरदार बॅटिंग केली. पत्रकारांनी त्यांना वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अधिवेशनाला उपस्थित राहणार का, अशी विचारणा केली. ते त्यांच्या सोयीने विधीमंडळ कामकाजात सहभागी होणार अजित पवारांनी स्पष्ट केली. वेगवेगळ्या मार्गांनी त्याच आशयाचे प्रश्न आल्यानंतर मुख्यमंत्री अधिवेशनाला येणार आहेत, हे आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा त्यांनी प्रतिसवाल करता एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री चहापानाला उपस्थित नसल्याचा मुद्दा लक्षात आणून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी व्हिडीओ काॅलवर संपर्क केला आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली आहे. त्यांनी मला, थोरात, एकनाथ शिंदे, जयंत पाटील यांना उद्या 9 वाजता बैठक घ्यायला लावली आहे. आज त्यांनी आम्हाला वर्षावर देखील बोलावलं होतं सर्व मंत्र्यांना त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांची तब्येत चांगली आहे. दोन दिवसांपूर्वीच ते विधानभवनात येऊन गेेले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

विधीमंडळाच्या कामाकाजात त्यांच्या सोयीनुसार सहभागी होणार असल्याचा त्यांनी निरोप दिल्याचे अजितदादांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या घटक पक्षाच्या नेत्यांशी ते बुधवारी बोलणार आहे. सत्ताधारी आमदारांशी ते संवाद साधणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. ही माहिती देऊनही मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबद्दल प्रश्न विचारले जाऊ लागल्याने आता मी काय स्पॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. पत्रकार परिषदेत त्यामुळे एकच हशा पिकला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित होते. या वेळी बोलताना अजित पवार म्हणाले की हे अधिवेशन नागपूरला व्हावे या मताचे हे सरकार होते. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे आम्ही हे अधिवेशन मुंबईत घेतले. पुढचे अधिवेशन नागपुरात होण्यासाठी निश्चित विचार होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी होत असल्याची टीका होत आहे. मात्र कोरोनाचे सावट असल्याने आम्हाला तसे करावे लागले. आम्ही इतर राज्यांतील अधिवेशनांबाबत देखील माहिती घेतली. तेथेही अशीच परिस्थिती आहे. कामकाजाच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आम्ही कामकाज सल्लागार समितीची बैठक घेणार आहोत. त्यानंतर कालावधी वाढविण्याबाबत विचार करू, असे त्यांनी सांगितले.

ओबीसी, वीजबिल, परीक्षा पेपरफुटी अशा अनेक विषयांवर आम्ही चर्चा करू शकतो. पाच प्रलंबित बिले आणि नवीन 26 विधेयके आम्ही घेत आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठीचे शक्ती विधेयक आणण्याची आमची तयारी आहे. राज्यातील कृषी विषयक विधेयके मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, अशी माहिती अजितदादांनी दिली.

विरोधी पक्षाने चहापानावर टाकलेल्या बहिष्काराबद्दल ते म्हणाले की आजवर सातत्याने इतका चहापानावर बहिष्कार कुणी टाकला नव्हता. प्रत्येक वेळेस काहीना काही मुद्दा काढून बहिष्कार टाकायचा, हे योग्य नाही.चहापानातून चर्चा होत असते. पण कुठला ना कुठला मुद्दा काढून भाजपची मंडळी बहिष्कार टाकत आहेत, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT