Congress, NCP, Shivsena (Thackeray group), BJP, Shivsena
Congress, NCP, Shivsena (Thackeray group), BJP, Shivsena Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : राज्याचे वातावरण तापणार; विरोधकांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारीही मैदानात उतरणार

सरकारनामा ब्युरो

MVA Vs BJP : सध्या महाविकास आघाडीतील पक्ष सरकारविरोधात ‘वज्रमूठ’ घट्ट करताना दिसत आहेत. भाजप मात्र आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ‘अलर्ट’वर झाले आहे. लोकांपर्यंत पोचण्यासाठी भाजप नवा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती आहे. त्यातून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे नेतेही राज्यभर एकत्र फिरून सरकारने केलेल्या कामांची छाप पाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सत्ताधारी-विरोधकही सभा, कार्यकमांतूनही एकमेकांसोमर येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींवर रणनीती ठरविण्यासाठी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकीचे नियोजन आहे. पुढील आठवड्यातच ही बैठक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. प्रदेश आणि मुंबई भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आगामी निवडणूक अजेंडा ठरविला जाण्याची चिन्हे आहेत.

केंद्र आणि शिंदे-फडणवीस सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने भाजपच्या वतीने जनआशीर्वाद यात्रा काढण्यात येत आहे. त्यातून शक्तीप्रदर्शन करीत, निवडणुकीची तयारी चालवली आहे.

दरम्यान, पुण्यातील कसबा पोटनिवडणूक जिंकल्याने महाविकास आघाडीला (MVA) बळ आले आहे. सध्या महाविकास आघाडीने राज्यात विभागानुसार वज्रमूळ विराट सभांचे आयोजन करून सत्ताधाऱ्याविरोधात रान उठविण्याचे नियोजन केले आहे. त्या सभांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्यभर आपली ताकद दाखविण्याच्या प्रयत्नात आहे.

राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेनेला (शिंदे गट Shivsena) साथीला घेऊन भाजप (BJP) आता निवडणुकांना सोमोरे जाणार आहे. त्यासाठी राज्यभर विशेष मोहिमा राबवून सरकार म्हणून लोकांपर्यंत पोचण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा विचार आहे. अशात सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेऊन महाविकास आघाडीचे नेते रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळे भाजपही नवे कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांत जाणार आहेत. परिणामी, विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यासाठी शिवसेना आणि भाजपही नेतेही एकत्रपणे लोकांपुढे जाण्याची चिन्हे आहेत.

याआधी मुंबईत भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत शिवसेनेचे (शिंदे गट) नेते सहभागी झाले होते. त्यातून सकारात्मक 'मेसेज' गेल्याचे भाजप नेत्यांना वाटत आहे. दरम्यान भाजपच्या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT