Pune APMC : सुरक्षारक्षकच करतात बाजार समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे काम

Campaign for APMC Election : निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
Pune APMC
Pune APMCSarkarnama

Pune Market Committee : निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रशासनाचे पुणे बाजार समितीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होऊ लागले आहेत. येथे वाहतूक कोंडी होत असताना बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डात नेमलेले सुरक्षारक्षक गायब असतात. मात्र ते निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे काम करताना दिसू लागले आहेत.

बाजारात वाहतूक कोंडी होत असल्याने हमाल बांधवांना स्वतः वाहतूक कोंडी दूर करून त्यांचे काम करावे लागत आहे. याकडे बाजार समिती प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सुरक्षारक्षक उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेचे काम करत असल्याने सुरक्षा व्यवस्थेचा ठेका नक्की कोणत्या उमेदवाराचा, अशी चर्चा बाजारात रंगली आहे.

Pune APMC
APMC Election : ...तर कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आलेला सदस्यही अपात्र ठरणार

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. पुणे बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रशासनाचे बाजार आवाराकडे दुर्लक्ष झाले आहे. गेल्या महिनाभरापासून बाजारातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.

या परिसरात शुक्रवार आणि रविवार हे दोन दिवस पहाटेपासून वाहतूक कोंडी होते. दररोज बाजाराच्या सर्व प्रवेशद्वारावर कोंडी होत असताना तिथे सुरक्षारक्षक उपस्थित नसतात. या कोंडीमुळे शेतमाल गाळ्यांवर पोहचण्यास उशीर झाल्यानंतर बाजार भावावर परिणाम होतो. त्याचा परिणाम शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते.

Pune APMC
Jayant Patil on Riot : छत्रपती संभाजीनगरकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केलं; जयंत पाटलांचा हल्लाबोल

बाजारात शेतमाल चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे बाजार समितीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. बाजारात कोंडी असताना समितीचे विभाग प्रमुखही दुर्लक्ष करत आहेत. दरम्यान गुलटेकडी मार्केटयार्डात नेमलेल्या सुरक्षारक्षक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे काम करताना दिसत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या प्रचार यंत्रणेत थेट हस्तक्षेप करणारी सुरक्षा व्यवस्थेचा ठेका नक्की कोणत्या उमेदवाराचा, अशी चर्चा बाजारात रंगली आहे.

बाजारातील वाहतूक कोंडीचा फटका व्यवहारांवर होतो. उशिरा व्यवहारामुळे शेतमालाचे भाव घसरुन शेतकऱ्यांसह आडते, खरेदीदार यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. मात्र, बाजार समितीचे याकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप व्यापारीवर्गाकडून होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com