Tukaram Mundhe sarkarnama
मुंबई

Tukaram Mundhe : मुंढेंच्या पुनर्नियुक्तीसाठी आरोग्य कार्यकर्ते मैदानात ; मोहीम सुरु, मुख्यमंत्र्यांना..

Tukaram Mundhe Transfer :.. हे सारे मुंढेंमुळे झाले.

सरकारनामा ब्युरो

Tukaram Mundhe Transfer: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत. आयुक्त, कुटुंबकल्याण, तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई या पदावर तुकाराम मुंढे कार्यरत होते. त्यांच्याकडून या पदाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. तसंच प्रकल्प संचालक, महरााष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. (Tukaram Mundhe Transfer latest news)

अतिशय शिस्तबद्ध आयएएस अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ज्या विभागात तुकाराम मुंढे जातात त्या विभागात ते आपल्या शिस्तीने कामावर छाप पडतात, अशी त्यांची ओळख आहे. त्यांची पुन्हा एकदा त्याच ठिकाणी पुनर्नियुक्ती करावी, यासाठी आता सामाजिक आरोग्य कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.

मुंढे यांच्या बदलीवर मौन का?

तुकाराम मुंढे यांच्या पुनर्नियुक्तीसाठी मोहीम सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना एक लाखाहून अधिक ईमेल पाठवून राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त म्हणून मुंढे यांची पुनर्नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करीत जनतेला हे आवाहन केलं आहे. "तुकाराम मुंढे यांच्या बदलीवर मौन का? आपली नाराजी व्यक्त करूया,", असे कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.

हे सारे मुंढेंमुळे..

"मी एक कार्यकर्ता आहे. मी बालविवाह रोखण्यासाठी काम करतो. मेळघाटातील एका दुर्गम आरोग्य केंद्राला दिलेल्या भेटीदरम्यान, आरोग्य कर्मचारी उपस्थित असतील की नाही याबद्दल मला शंका होती, तेथे डॉक्टर उपलब्ध आहेत हे जाणून मला आश्चर्य वाटले, हे सारे मुंढेंमुळे झाले.

तर नक्कीच दबाव निर्माण होईल..

"प्रत्येकाने आपली निराशा व्यक्त करण्याऐवजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ईमेल करणे आवश्यक आहे. मुंढेंची ही बदली मागे घेण्याची आणि आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मुंढे यांची पुनर्नियुक्ती करण्याची मागणी आपण वाढवली पाहिजे. किमान एक लाख ईमेल आणि संदेश पाठवले मुख्यमंत्री आणि प्रशासनाला पाठवले तर नक्कीच दबाव निर्माण होईल," कुलकर्णी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT