Paresh Rawal : भाजप नेते 'बाबूभैया' अडचणीत ; माफी मागितल्यानंतरही गुन्हा दाखल

Gujrat Election 2022 : बंगाली समुदाय आणि देशभरातील इतर समुदायांमधील सलोखा नष्ट करण्यासाठी परेश रावल यांनी असं विधान केल्याचा आरोप सलीम यांनी केला आहे.
Paresh Rawal
Paresh Rawalsarkarnama
Published on
Updated on

Gujrat Election 2022 : निवडणुकीचा (Gujrat Election) पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या रणधुमाळीत ज्येष्ठ अभिनेते, भाजपचे माजी खासदार परेश रावल (Paresh Rawal)हे वादात सापडले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परेश रावल यांनी बंगाली समाजाबाबत केलेल्या वादग्रस्त विधान त्यांना भोवलं आहे. (Gujrat Election 2022 Paresh Rawal Viral Video news update)

गुजरातमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी याची ही वात लावली आणि त्यांचे फटाके आता बंगालमध्ये उडत आहेत. माफी मागितल्यानंतरही आता या 'बाबूभैया'वर गुन्हा दाखल झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव मोहम्मद सलीम यांनी त्यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.

Paresh Rawal
Gujarat election 2022 : मोदी भीक मागताहेत..; नाना पटोलेंचा हल्लाबोल

'परेश रावल यांच्या भाषणामुळे बंगाली लोकांविरुद्ध द्वोषाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे' असा आरोप सलीम यांनी आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.सार्वजनिक ठिकाणी अशी भाषणे करणे म्हणजे दंगली भडकावण्यासारखे आहे. बंगाली समुदाय आणि देशभरातील इतर समुदायांमधील सलोखा नष्ट करण्यासाठी परेश रावल यांनी असं विधान केल्याचा आरोप सलीम यांनी केला आहे.

गुजरातमधील वलसाडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान परेश रावल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. मनोरंजन असो की राजकारण परेल रावल नेहमीच बिनधास्त, मोकळेपणानं मत व्यक्त करीत असतात, त्यामुळे ते अडचणीत येतात. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर आता 'बाबूभैया'पोलिसांना काय उत्तर देणार, यावरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगल्या आहे.

Paresh Rawal
Congress : काँग्रेस 'या' मुद्यांवरुन करणार मोदी सरकारची कोंडी

बाबूभैया, तुम्ही तर असे नव्हता : आझाद

परेश रावल यांच्या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांची त्यांच्यावर टीका सुरु आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते कीर्ती आझाद (Kirti Azad) यांनी परेश रावल यांच्यावर निशाणा साधला. "बाबूभैया तुम्ही तर असे नव्हता. जर बांगलादेशी आणि रोहिंग्या भारतात घुसत आहेत, तर याचा अर्थ गृहमंत्री काम चोखपणे करू शकत नाहीत," असं आझाद यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते परेश रावल..

गॅस सिलिंडर महाग आहेत, पण काळजी करू नका ते स्वस्त होतील. लोकांना रोजगार देखील मिळेल, पण रोहिंग्या मुस्लिम आणि बांग्लादेशी तुमच्या आजूबाजूला राहू लागतील तेव्हा काय होईल? हे दिल्लीत घडतंय. मग तेव्हा तुम्ही गॅस सिलिंडरचे काय करणार? बंगाली लोक मासे कसे शिजवणार का?

परेश रावल यांचा माफीनामा..

“बंगाली म्हणजेच बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या असे मला म्हणायचे होते. मात्र माझ्या टिप्पणीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो”,

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com