मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh khan) मुलगा आर्यन खान (Aryan khan) सध्या जामिनावर बाहेर आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी (Drugs party) प्रकरणी त्याला अटक झाली होती. आर्यनला अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या (NCB) कार्यालयात दर आठवड्याला हजेरी लावावी लागत आहे. यामुळे त्याने आता जामिनाच्या आदेशात सुधारणा करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
क्रूझ ड्रग प्रकरणात जामीन देताना आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांना न्यायालयाने काही अटी घातल्या होत्या. आर्यनला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट न्यायालयाने घातली होती. त्यानुसार आर्यनला हजेरी लावताना प्रत्येक वेळी त्याला जामिनाची कागदपत्रे सादर करून एनसीबीच्या हजेरी पुस्तकात सही करावी लागते. आता जामिनाच्या आदेशात सुधारणा करावी, यासाठी त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाने अखेर आर्यनला दिलासा दिला आहे. त्याला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात दर आठवड्याला हजेरी लावण्यापासून मुभा मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास एनसीबीचे मुंबई कार्यालय करीत आहे. त्यामुळे एनसीबीच्या आर्यनची चौकशी करावयाची असल्यास त्याला 72 तास आधी नोटीस द्यावी लागेल. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्यनची एनसीबीच्या कार्यालयातील आठवडी हजेरीतून मुक्तता झाली आहे.
एनसीबीच्या कार्यालयात दर आठवड्याला हजेरी लावण्याची अट जामिनाच्या आदेशातून काढून टाकावी, अशी मागणी आर्यनने उच्च न्यायालयात केली होती. आता या प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीच्या विशेष तपास पथकाकडे देण्यात आला आहे. त्यामुळे एनसीबीच्या मुंबई कार्यालयातून हजर राहण्याची अट रद्द करावी, असे त्याने म्हटले होती. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात एनसीबीच्या कार्यालयासमोर असल्यामुळे दरवेळी त्याच्यासोबत पोलिसांना राहावे लागते, असे कारणही त्याने दिले होते.
उच्च न्यायालयाने आर्यन खानला अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. त्यानुसार त्याला प्रत्येक शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत मुंबईतील एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागत आहे. आर्यन खान 30 ऑक्टोबरला आर्थर रोड कारागृहातुन बाहेर आला होता. एनसीबीने 2 ऑक्टोबरला कॉर्डेलिया क्रूझवर सुरु असलेल्या पार्टीवर समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली छापा मारला होता. यावेळी काही जणांकडे ड्रग्ज आढळल्याचा एनसीबीचा दावा आहे. याच प्रकरणात त्यावेळी आर्यनसह 8 जणांना अटक करण्यात आली होती. पुढे तब्बल 27 दिवसानंतर त्याची सुटका झाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.