वानखेडेंच्या अडचणी वाढल्या! मलिक आता थेट जात पडताळणी समितीत

समीर वानखेडे यांचे जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार जातपडताळणी समितीकडे करण्यात आली आहे.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार जातपडताळणी समितीकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी वानखेडे यांनी समितीसमोर हजर राहण्यास बजावण्यात आले होते. आता या प्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी थेट समितीकडे धाव घेतली आहे.

मलिक यांनी वानखेडे यांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. यामुळे दिवसेंदिवस वानखेडेंच्या अडचणीत वाढ होत आहे. आता जात पडताळणी समितीकडे मलिक यांनी धाव घेतल्याने वानखेडेंसमोर नवीन अडचणी निर्माण झाल्याचे मानले जात आहे. मलिक यांनीच वानखेडेंच्या जातीचा आणि जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाने मलिक यांना या प्रकरणी सुनावले होते. तुम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याची मागणी का करीत नाही? अशी विचारणा उच्च न्यायालयाने केली होती. यानंतर आता मलिक यांनी समितीकडे धाव घेतली आहे. वानखेडेंवरील आरोपासंदर्भात पुरावे ते समितीसमोर सादर करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Nawab Malik
गड आला पण सिंह गेला! विधान परिषदेत भाजपला मोठा धक्का

वानखेडे यांचा जातीचा मिळालेला किंवा घेतलेला खोटा दाखला चौकशी करुन रद्द करावा व त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी केली होती. त्यांच्या वतीने वकील नितीन सातपुते यांनी मुंबईच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे बाजू मांडली होती. वानखेडे यांचे जन्मदाखला, जात प्रमाणपत्र, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची कागदपत्रे सातपुते यांनी समितीसमोर मांडली. तसेच आणखी काही पुरावे पुढील सुनावणीच्या वेळी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Nawab Malik
काँग्रेसच्या अब्जाधीश भंगारवाल्याला भाजपनं विधान परिषदेत चारली धूळ

या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यानुसार वानखेडे यांना हजर राहण्यास सांगण्यात आले होते. वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी फसवणुकीने महार जातीचा दाखला घेतला असल्याचा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावरून गेले दोन महिने मोठा वाद सुरू आहे. आपण व आपले वडिल हे हिंदूच असल्याचे दावा वानखेडे यांनी वारंवार केला आहे. त्यामुळे या प्रकरणात जात पडताळणी समिती यावर काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com