Mumbi Neews : मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी फौजदारी रीट याचिका सदावर्ते यांनी हायकोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी दुपारी मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान, मुंबई हायकोर्टाने गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली आहे. याप्रकरणी मनोज जरांगेंना हायकोर्टाने नोटीस जारी केली आहे.
मनोज जरांगे-पाटील सरकारला वेठीस धरत असून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. मराठा आंदोलक मुंबईत आल्यास राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा आरोपही गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या याचिकेतून केला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांची पदयात्रा मुंबईकडे निघाली आहे. सरकार आता जरांगे-पाटील यांच्यासोबत संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनीदेखील जरांगे-पाटील यांच्यावर निशाणा साधत संविधानाच्या मार्गाने प्रश्न सोडवू त्यांनी धीर धरावा, असे म्हटले होते. त्याला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच छगन भुजबळ यांनादेखील चॅलेंज केले आहे.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मराठा समाजाचा मोर्चा मुंबई येथे काढला जात आहे. राज्य सरकारने आरक्षण जाहीर न केल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे.
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मागासवर्गीय आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि स्थानिक संस्था स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना दिलेल्या आहेत. त्यानुसार हे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
R...