Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यात येणार आहे. हे मागासलेपण तपासण्याची जबाबदारी राज्यमागास वर्ग आयोगाकडे देण्यात आले आहे. (Latest Marathi News)
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सुचनेनुसार मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. यासाठीचे एक ॲप तयार करण्यात आले आहे. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स या संस्थेने हे ॲप तयार केले आहे. मात्र, या ॲपमध्ये नवीन नगरपालिकांच्या नावांचा समावेश नाही. त्यामुळे देहू, इंदापूर या नगरपालिका क्षेत्रात सर्वेक्षणाचे काम सुरूच झाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच या ॲपचा सर्व्हर डाऊन असल्याने माहिती भरण्यास अडथळे येत असल्याची तक्रार केली जात आहे. त्यामुळे हे काम संथ गतीने सुरू आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय मागासवर्गीय आयोगाला याची माहिती दिली असून ॲप मधील तांत्रिक अडथळे तातडीने दूर करावेत, असे पत्र गोखले इन्स्टिट्यूटला देखील पाठवले आहे. या ॲप मध्ये देहू तसेच इंदापूर यांच्या नावाचा समावेश झाल्यानंतर तेथे प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून मराठा समाजाचा मोर्चा मुंबई येथे काढला जात आहे. राज्य सरकारने आरक्षण जाहीर न केल्यास 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. तर मराठा समाजाचे मागासले पण तपासण्यासाठी 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मागासवर्गीय आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि स्थानिक संस्था स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना दिलेल्या आहे. त्यानुसार हे सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
गोखले इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण मंगळवारी प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. त्यासाठी जिल्हाभरात ग्रामीण, नगरपालिका व महापालिका क्षेत्रातून सुमारे 11 हजार कर्मचारी, अधिकारी हे सर्वेक्षण करीत आहेत. सर्वेक्षण करताना अनेक प्रगणकांना सर्व्हर संदर्भातील अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मोबाईलमध्ये हे ॲप आहे. त्याची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. त्यामुळे सर्वेक्षणाचे काम संथगतीने सुरू असल्याचे काही प्रगणकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वयकांना कळविले. या सर्व अडचणी आयोगासह संबंधित संस्थांना विभागांना कळविण्यात आल्या असून यावर तोडगा काढला जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. आयोगाने ठरवून दिलेल्या मुदतीत हे सर्वेक्षण पूर्ण केले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.