Parambir singh  Sarkarnama
मुंबई

Parambir Singh Latest news: उच्च न्यायालयाचा परमबीर सिंहाना दिलासा: चौकशीची याचिका फेटाळली

अँटेलिया स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी पुन्हा चौकशीसाठी न्यायालयात रिट याचिका करण्यात आली होती.

सरकारनामा ब्युरो

Parambir Singh Latest news Update: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अँटेलिया स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्ये प्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. (High Court Relief to Parambir Singh: Inquiry Petition Dismissed)

अँटेलिया स्फोटक प्रकरणी आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी पुन्हा चौकशीसाठी न्यायालयात रिट याचिका करण्यात आली होती. पण न्यायमूर्ती सुनील शुकरे आणी कमल खाता यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. परमबीर सिंह यांच्यावर खंडणी, भ्रष्टाचार आणि गैरवर्तणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अँटिलिया बॉम्ब प्रकरणी त्यांच्या कथित वागणुकीमुळे त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदावरून निलंबित करण्यात आले होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (parambir singh) चर्चेत आले होते. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. ऑक्टोबर महिन्यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंह कोणाच्याही संपर्कात नव्हते. पण अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाल्यानंतर आता त्यांनाही न्यायालयाने दिलासा दिला आहे.

परमबीर सिंह यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने त्यांच्यावर 5 वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. यापूर्वी हे सर्व गुन्हे मुंबई पोलिसांनी नोंदवले होते. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास केला होता, नंतर हे प्रकरण सीबीआयने ताब्यात घेतले. त्याचवेळी मुंबई पोलिसांसह एनआयएकडून अँटिलिया प्रकरणाचाही तपास करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT