माधव सावरगावे
Chhatrapati Sambhajinagar : शिंदे - फडणवीस सरकारनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करण्यास मान्यता दिली. याबाबतचा निर्णय १६ जुलै २०२२ रोजी घेऊन मंजुरीसाठी केंद्र सरकारकडं पाठवण्यात आला. केंद्र सरकारनेही २४ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिसूचना काढली. या निर्णयानंतर जल्लोष करण्यात आला.
पण खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारच्या अधिसूचनेनंतर आंदोलन सुरू केलं. छत्रपती संभाजीनगर नामांतरावरचे सगळे अडथळे आता दूर होतील आणि छत्रपती संभाजीनगर हेच नाव कायम राहणार यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.
औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर( Chhatrapati Sambhajinagar )असं करण्यात आल्यामुळे चांगलाच वाद पेटला आहे. या नामांतराला एमआयएमनं विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वीच एमआयएमचे खासदार जलील यांनी या नामांतराविरोधात आंदोलन केलं होतं. तर दुसरीकडे नामांतराच्या समर्थनार्थ मनसे रस्त्यावर उतरल्याची पाहायला मिळालं. दरम्यान, नामांतरावर आक्षेप घेण्याची अंतिम मुदत २७ मार्च होती. औरंगाबादच्या नामांतरावर मागील महिन्याभरापासून आक्षेप, हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या होत्या.
औरंगाबादच्या नामांतरावरुन खासदार इम्तियाज जलील, एमआयएम पक्ष आणि मुस्लिम संघटनांनी विरोध करीत आंदोलन सुरू केले. शिवाय कोर्टाचीही पायरी चढली. पण आता ते टिकणार नाही आणि छत्रपती संभाजीनगरच हे नाव कायम राहील असे स्पष्ट दिसतेय. कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयानंतर राज्य सरकारने ज्या आक्षेप, हरकती आणि सूचना मागवल्या होत्या, त्यात सर्वात जास्त या समर्थनाच्या सूचना आहेत.
आता छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ एकूण अर्जांची संख्या ४ लाख ३ हजार १५ तर विरोधात २ लाख ७३ हजार २१० हरकती आल्या आहेत. त्यामुळे आता अडथळे दूर होऊन छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून सुरू असलेल्या राजकारणाचा धुरळा अखेर शांत बसण्याची चिन्हं आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.