Devendra Fadnavis, Sharad Pawar
Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

पवारांवरील टीकेनंतर हिंदू महासभा मैदानात; फडणवीसांना विचारले 17 प्रश्न

सरकारनामा ब्युरो

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरूवारी एकापाठोपाठ 14 ट्विट करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता हिंदू महासभेने (Hindu Mahasabha) फडणवीसांना 17 प्रश्न विचारले आहेत. ही प्रश्नपत्रिकाच फडणवीसांना पाठवणार असल्याचे महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी त्यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभांनंतर हिंदूत्व, भोंगे, जातीयवाद, हनूमान चालिसा, बाबासाहेब पुरंदरे, जेम्स लेन आदी मुद्यांवर राजकारण तापलं आहे. त्यामध्ये आता हिंदू महासभेनेही उडी घेतली आहे. राज ठाकरेंच्या टीकेनंतर पवारांनी त्यावर पलटवार केला. तर फडणवीसांनी सलग 14 ट्विट करून पवार यांच्या विविध भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून निशाणा साधला होता.

या वादाच्या पार्श्वभूमीवर दवे यांनी फडणवीसांना 17 प्रश्न केले आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर झालेले अत्याचार, मंडल आयोग, मराठा आरक्षण (Maratha Reservation) आदी मुद्यांवरून दवे यांनी फडणवीसांना घेरलं आहे. हिंदू समाजातील एक समाज दुसऱ्या समाजाला शत्रु समजू लागला. मराठा आरक्षण देऊन मराठी आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याचे पाप फडणवीस सरकारने केले आहे. प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र होस्टेल करून विद्यार्थ्यांना जातींमध्ये विभागल्याचा आरोप दवे यांनी केला.

विविध समाजाची आर्थिक महामंडळ जाहीर करून त्याला मदत केली नाही. त्यांना कार्यालय नाही, पैसे दिले नाहीत. फक्त प्रत्येक समाजाने दुसऱ्या समाजाला शत्रू समजावे आणि हिंदू समाजाची ताकद कमी व्हावी, हे सगळं कुणी घडवलं, याचं उत्तर भाजप आणि फडणवीस यांनी द्यावं, असं आव्हान दवे यांनी केलं आहे. दवे यांच्या या प्रश्नांवरून आता पुन्हा एका राजकारण तापण्याची शक्यता आहे.

दवे यांनी उपस्थित केलेले काही प्रश्न -

- जगमोहन यांच्या काळात काश्मीरमध्ये हिंदूच्या हत्या झाल्या. त्यांनाच भाजपने दोनवेळा खासदार केले?

- व्ही. पी. सिंग यांचे सरकार असताना मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली. त्यावेळी भाजपनं विरोध का केला नाही?

- व्ही. पी. सिंग यांनी मंडल आयोग आणला. या आयोगामुळे समाजामध्ये तेढ निर्माण झाली. भाजपने त्याला विरोध का केला नाही?

- मराठा आरक्षण आणून मराठा-ओबीसी वाद का निर्माण केला?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT