काँग्रेसला बसणार धक्का? 'आप'नं हार्दिक पटेल यांना दिली ऑफर

हार्दिक पटेल यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर आता राजकारण तापलं होतं.
AAP Offers Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates
AAP Offers Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News UpdatesSarkarnama

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत नाराजी समोर आली आहे. प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षावर टीकेची झोड उठवल्यानंतर आता राजकारण तापलं होतं. पटेल हे पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहेत. त्यातच आम आदमी पक्षाने (AAP) त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे आता पटेल काय भूमिका घेणार, याकडे लक्षं लागलं आहे. (AAP Offers Hardik Patel)

पटेल यांनी पक्षावर आपल्याला दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला आहे. "नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे", असे वक्तव्य त्यांनी केलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमधून ते बाहेर पडू शकतात, अशी चर्चा गुजरातमध्ये सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झालं आहे.

AAP Offers Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates
'यूपी'त राजकीय भूकंप होणार; अखिलेश यांच्या काकांनी उचललं मोठं पाऊल

पटेल यांची नाराजी समोर आल्यानंतर गुजरात आपचे अध्यक्ष गोपाळ इटालिया यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. ते म्हणाले, हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये खुश नसतील तर त्यांनी आपसारख्या समविचारी पक्षामध्ये यावे. काँग्रेसवर नाराजी व्यक्त करून वेळ घालवण्यापेक्षा त्यांनी लगेच आपमध्ये यायला हवे. काँग्रेससारख्या पक्षाकडून त्यांच्यासारख्या नेत्यांना योग्य जागा दिली जात नाही, असंही इटालिया म्हणाले.

पटेल म्हणाले, काँग्रेसमध्येच राहणार!

काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, मी आतापर्यंत पक्षासाठी 100 टक्के योगदान दिलं आहे. यापुढेही पक्षात काम करत राहीन. आम्ही गुजरातचा चांगला विकास करू. पक्षामध्ये काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पण आम्हाला गुजराच्या विकासासाठी एकत्र राहून काम करायचे आहे, असं सांगत पटेल यांनी काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

काय म्हणाले होते हार्दिक पटेल?

काँग्रेसमध्ये निर्णय शक्तीचा आभाव आहे. केंद्रात आणि राज्यात जास्त नेते असल्याने पक्षात कोणताही निर्णय होत नाही. पाटीदार नेते नरेश पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या निर्णयावर होत असलेल्या विलंबावर देखील हार्दिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या विलंबामुळे समाजाचा अपमान होतं आहे आणि हा अपमान सहन केला जाणार नाही. दोन महिने झाले मात्र अद्याप त्यांच्या प्रवेशाबद्दलचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे काँग्रेस हायकमांड आणि स्थानिक नेतृत्वाने लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही पटेल यांनी केली आहे.

AAP Offers Hardik Patel, Hardik Patel News updates, Gujrat News Updates
रतन टाटांना 'संघा'विषयी काय वाटत होतं? गडकरींनीच सांगितला किस्सा

हार्दिक पटेल यांनी प्रदेश काँग्रेस समितीवर देखील आरोप केले आहेत. मला कोणत्याही बैठकांना बोलवले जात नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी माला सल्ला, मत विचारले जात नाही किंवा त्यावर विचार केला जात नाही. मग या पदाचा उपयोग काय? गुरजात काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष होणे याचा अर्थ नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी अवस्था करुन घेणे आहे. काँग्रेसमध्ये अनेक लोकांचे मत आहे की पक्ष हार्दिक पटेलचा योग्य वापर करुन घेत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com