Dombivali Band
Dombivali Band Sarkarnama
मुंबई

Dombivali news : अंधारेंविरोधात भाजप, शिंदेगटासह हिंदू संघटना आक्रमक: पण डोंबिवलीकरांच्या मनात काही वेगळच...

सरकारनामा ब्युरो

Dombivali news उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रातील संतांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना, वारकरी संप्रदाय, बजरंग दल, भाजप यांच्यावतीने शनिवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, या बंदला डोंबिवलीकरांनी अल्प प्रतिसाद दिल्याचे चित्र पहायला मिळाले आहे. सकाळपासून सर्व अत्यावश्यक सेवा सुविधा सुरळीत सुरु असल्याने नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही.

रिक्षा सेवा देखील सुरळीत सुरु असल्याने भाजपा प्नणित रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांना रिक्षा बंद करण्यास सांगितले. मात्र त्यांच्याही आवाहनला रिक्षा चालकांनी फारसा प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले नाही. रिक्षा चालकांनी देखील या बंदला न जुमानता आपला व्यवसाय सुरु ठेवला.

अखेर, बाळासाहेबांची शिवसेना व वारकरी संप्रदाय, भाजपा, बजरंग दल यांच्यावतीने इंदिरा चौक येथे सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केला. “संतांविषयी अंधारे यांनी केलेले वक्तव्य योग्य नाही. यापुढे कोणीही संतांविषयी बोलण्याची हिम्मत करु नये यासाठी हे आंदोलन करण्यात आले”, अशी माहिती यावेळी वारकरी संप्रदायाने दिली. त्यानंतर शहरातील सर्व सेवा सुविधा सुरळीत सुरू झाल्या.

डोंबिवलीतील व्यापारी संघटनेने देखील दुपारपर्यंत या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. परंतू शहरातील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत दुकाने बंद होती. शनिवारी सकाळी शहरातील रिक्षा तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने व इतर वाहतूक सुविधा सुरळीत सुरु होत्या. तर काही दुकानदारांनी सकाळी 10 ऐवजी 11 वाजता दुकाने सुरु करत बंदला पाठिंबा असल्याचा केवळ दिखावा केला.

दरम्यान, या आंदोलनात भाजपचे मंत्री, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नसल्याने चांगलीत चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT