Rupali Patil Thombare : मोर्चाला जाण्यापूर्वी रूपाली पाटील ठोंबरे यांची राज ठाकरेंवर टीका, म्हणाल्या...

Rupali Patil Thombare : गुवाहाटीला कोणत्या विकासासाठी गेला होतात?
Rupali Patil Thombare :
Rupali Patil Thombare : Sarkarnama
Published on
Updated on

Rupali Patil Thombare : महापुरुषांचा होणारा अपमान हा मु्द्दा घेऊन महाविकास आघाडीने विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी पुणे शहरातून मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या सुद्धा मुंबईला मोर्चासाठी निघाले आहेत. मोर्चाला निघताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे.

Rupali Patil Thombare :
Dombivali News : अंधारेंच्या निषेधार्थ डोंबिवली बंदला मनसेचा पाठिंबा नाही ; राजू पाटलांनी सरकारला सुनावले!

रूपाली पाटील ठोंबरे म्हणाले, राज्यपालांच्या विरोधात भाजपने काळे झेंडे का दाखवले नाही. ते फक्त सोयीचं राजकारण करत आहे" यावेळी त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज्यपालांच्या विधानावर ते गप्प का बसले? मनसेची परिस्थिती म्हणजे काय सोडायचं आणि काय धरायचं अशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज की… म्हटल्यानंतर ज्यांच्या तोंडून आपोआप जय असा उच्चार निघतो, असे लोक देखील राज्यपालांच्या विधानावर काहीच बोलले नाहीत, असा सणसणीत टोला रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता अप्रत्यक्षपणे लगावला आहे.

मोर्चा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. भाजप नेते सतत बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्याविरोधातील हा मोर्चा काढलेला आहे, असं रुपाली पाटील म्हणाल्या. मुख्यमंत्री कोणत्या विकासाचं राजकारण करत आहेत? एकनाथ शिंदेंना कोणत्या विकासासाठी फोडलं गेलं? गुवाहाटीला कोणत्या विकासासाठी गेला होतात? सूडबुद्धीचे राजकारण यांच्याकडून सुरू आहे, असे पाटील म्हणाल्या.

Rupali Patil Thombare :
Nilam Gorhe : महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये का केली जातायेत? नीलम गोऱ्हेंनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com