संदीप पंडित
Hitendra Thakur News : वसई-विरार म्हणजे हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडीचा (बविआ) बालेकिल्ला. मात्र, लोकसभेला बविआच्या उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवानंतर हिंतेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना देखील विधानसभेला पराभव पत्काराव लागला. या पराभवामुळे ठाकूर कुटुंबीय बॅकेफूटवर गेल्याची चर्चा होती. मात्र, वसई-विरारचे राजकारण मुळापासून माहित असलेल्या हितेंद्र ठाकूरांनी एल्गार मोर्चातून पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे.
वसई-विरारमधील रस्त्यांची झालेली चाळण आणि खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण आहेत. खड्ड्यांमुळे अपघात होत काही जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यामुळे एल्गार मोर्चा काढून पालिकेने रस्त्यांमध्ये सुधारणा करावी, अशी मागणी बविआकडून करण्यात आली. या मोर्चात बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी थेट पालिका अधिकाऱ्यांना इशारा दिला. ते म्हणाले, कारभार सुधारला नाही तर मला पूर्वीचे रौद्ररूप धारण करावे लागेल.फक्त जाहिरात बाजी न करता काम करा.
वसई–विरार परिसरातील बिकट रस्त्यांच्या स्थितीवरून बहुजन विकास आघाडीने प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार संताप व्यक्त करत माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी महानगरपालिका मुख्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. काही काळापासून संभ्रम अवस्थेत असलेले बविआचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे हा मोर्चा म्हणजे आगामी महापालिका, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी शक्ति प्रदर्शन असल्याचे देखील बोलले जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वसई–विरार महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. मुख्य रस्त्यांपासून गल्लीबोळांपर्यंत सर्वत्र खड्डेच खड्डे असून, यामुळे वाहनचालक आणि पादचारी यांचे हाल होत आहेत. अनेक अपघात घडून निष्पाप नागरिकांचे प्राण गेले आहेत. याबाबत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीने हा मोर्चा काढला होता.
वसई–विरार शहरात कोट्यवधींच्या निधीचे काम दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था चाळीस वर्षांपूर्वीप्रमाणे झाली आहे. जर रस्त्यांची दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याची कामे तातडीने केली नाहीत, तर पुढील वेळी याहून मोठा आंदोलनाचा करण्यात येईल आणि हा मोर्चा शांततेत पार पडला असला तरी पुढच्यावेळी ही शांतता नसेल, असा इशारा क्षितिज ठाकूर यांनी दिला.
मोर्चा नंतर वसई-विरार महापालिकेचे बांधकाम अभियंता प्रदीप पाचंगे यानी बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारले. या मोर्चात माजी खासदार बळीराम जाधव, माजी आमदार राजेश पाटील, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर, प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर प्रकाश रोड्रिंक्स, बविआ प्रवक्ता आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील, प्रशांत राऊत,माजी नगरसेविका, नगरसेवक,पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सामील झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.