non agricultural tax Maharashtra: राज्यातील गृहनिर्माण संस्थांवरील एनए कर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली. जुन्या आणि नव्या बांधकामांवर आता हा कर आकारला जाणार नाही. त्याचबरोबर जुनी थकबाकीही माफ करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी काही महत्वाची घोषणा त्यांनी केली आहे.
विधानसभेत बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी आता वार्षिक एनए टॅक्स रद्द केला आहे. त्यामुळं जुना आणि नवीन कुठेही टॅक्स लागणार नाही, त्यामुळं टॅक्स फ्री झालं आहे. जुने एनए झाले असतील, जुने बांधकाम झाले असतील, नवीन बांधकाम होणार आहेत त्यांना एनए टॅक्स लागणार नाहीत.
एनएची अट काढून टाकली आहे. त्यामुळं या संस्थांना आता कुठेही एनए करता जावं लागणार नाही. तुमच्या भागात ज्या गृहनिर्माण संस्था आहेत त्यांच्याकडून आता कुठलाही नवा कर घ्यावा लागणार नाही, सर्व कर रद्द करण्यात आला आहे त्याचबरोबर या टॅक्सची थकबाकीही शासनानं माफ केली आहे.
तसंच शेतकऱ्यांसाठी ई-पीक फेरा नोंदणीत ऑफलाईन सुविधेसह राज्यातील पाणंद रस्त्यांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.