Sharad Pawar
Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

शिंदे सरकार किती दिवस टिकणार..? शरद पवार म्हणाले....

सरकारनामा ब्यूरो

ठाणे : शिंदे (Eknath Shinde) सरकार किती दिवस टिकणार?, या प्रश्नावर ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) म्हणाले की मी काही भविष्य करणारा ज्योतिषी नाही. पण, सरकार ज्या पद्धतीने बनलं आहे, ते तुम्हाला जास्त माहिती आहे. सरकारचे नेतृत्व करणाऱ्या लोकांची ओळख माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे, कारण तुम्ही ठाणेकर (Thane) आहात, त्यामुळे तुम्हीच निष्कर्षापर्यंत या, असे सांगून पवारांनी शिंदे सरकारच्या भवितव्याचा प्रश्नाचा चेंडू पत्रकारांच्या कक्षात पुन्हा ढकलला. (How long will Eknath Shinde's government last...? Sharad Pawar said..)

तोडफोडीतून निर्माण झालेले सरकार जादा काळ टिकत नाही, असा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे सध्याचे एकनाथ शिंदे सरकार किती दिवस टिकेल, असं आपल्याला वाटतं, असा प्रश्न ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी पवार यांनी वरील उत्तर दिले.

पवार म्हणाले की, सरकारचे नेतृत्व करणाऱ्या लोकांची ओळख माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे, कारण तुम्ही ठाणेकर आहात. त्यामुळे महापालिका, पालिकेच्या संस्था, पालिकेचे कार्यक्रम आणि उपक्रम कोणत्या पद्धतीने हाताळले जातात, हे मला बारामतीला बसून जास्त माहित नसतं. पण, तुम्हाला ठाण्यात बसून कदाचित माझ्यापेक्षा अधिक माहिती असू शकेल. त्यामुळे तुम्हीच या निष्कर्षापर्यंत या.

केंद्रीय यंत्रणांकडून सुरू असलेल्या चौकशांवर पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, कोणाच्या विरोधात ईडी, सीबीआय लावता येईल का, याकडेच केंद्र सरकारचे लक्ष आहे. विरोधी पक्षांची सत्ता उलथवून टाकण्याचे काम सध्या सुरु आहेत. कर्नाटकातील काँग्रेस-जनता दलाचे, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. अनेक राज्यामध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत. गुजरात, आसाम ही मोजकी राज्य सोडली, तर भाजपकडे राज्य नव्हती. माणसे फोडणे आणि सरकार स्थापन करणे. ईडीचा वापर करणे असे उद्योग सध्या सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT