पंढरपूर : पंढरपूरचे (Pandharpur) अभिजीत पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. ते एक तरूण उद्योजक आहेत. त्यांना साखर कारखाने चालवण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्यांच्या पाठीशी मी उभा आहे. मुंबई बॅंकेनेदेखील पाटील यांना मदत केलेली आहे. या चौकशीच्या फेऱ्यातून ते लवकरच बाहेर पडतील, अशी क्लिनचीट देत अभिजीत पाटील लवकरच भाजपमध्ये (BJP) येतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी आज (ता. २९ ऑगस्ट) पंढरपुरात व्यक्त केला. (Pandharpur's Abhijit Patil to join BJP soon : Pravin Darekar)
आमदार प्रवीण दरेकर हे आज तिरंगा रॅलीसाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी अभिजीत पाटील आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली. भेटीनंतर दरेकर यांनी अभिजीत पाटील यांना क्लिनचीट देत ते भाजपमध्ये येतील, असे स्पष्ट केले.
विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीनंतर अभिजीत पाटील हे चर्चेत आले होते. त्यांनतर त्यांच्या कारखान्यावर आणि घरावर प्राप्तीकर विभागाने छापे टाकले होते. चौकशीनंतर दुसऱ्याच दिवशी प्रवीण दरेकर यांनी अभिजीत पाटलांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर अभिजीत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरेकर म्हणाले की, आता भाजपकडे सगळेच येत आहेत. अभिजित पाटील एक दिवस भाजपमध्ये येतील. भाजप अभिजित पाटील यांच्या पूर्ण पाठिशी आहे. एखादा मराठी उद्योजक पुढे येत असेल, आपले धंदे विस्तारत असेल. चार चार कारखाने यशस्वीपणे चालवत असेल तर त्या मराठी उद्योजकाला पाठबळच दिले पाहिजे ना? का त्याला अडचणीच्या काळात दूर फेकून द्यायचे. मला यात (इन्कम टॅक्स छाप्यासंदर्भात) अजिबात विशेष वाटत नाही. त्यांची एक प्रक्रिया असते, ती यंत्रणा पूर्ण करत असतात. जेव्हा आपण दुसऱ्याला बोलतो की, तपास यंत्रणा असतात, त्या आपले काम करत असतात. त्याच पद्धतीने अभिजित पाटील यांच्या प्रकरणात त्या यंत्रणा त्यांचे काम करत असतील. त्यात कर नसेल तर डर कशाला? त्यांना लागणारी सर्व माहिती अभिजित पाटील देतील.
अभिजित पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांना आतापर्यंत सहकार्य केलेले आहे. एखादा मराठी उद्योजक पुढे येतो, तेव्हा त्यांची उमेद वाढवायची असते. इन्कम टॅक्सबाबत काय झालं, हे मला माहिती नाही. पण त्यांना नाउमेद करून एका बाजूला टाकणे योग्य नसते. ते एक चांगले व्यावसायिक आहेत, ते यंत्रणेला योग्य पद्धतीने उत्तरे देतील. त्यांनी काय चुकीचे केले आहे, असे मला अजिबात वाटत नाही, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.