मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे यांच्या हैदराबाद गॅझेटियरसह इतर महत्वाच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळं जरांगेंनी आपलं उपोषण मागे घेतलं, त्यानंतर काही वेळातच त्यांनी हायकोर्टाच्या आदेशानुसार मुंबईतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण आजच्या उपोषणाच्या पाचव्या दिवसानंतर त्यांची प्रकृती कशी आहे? त्यांना नेमकं कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेलं जाणार? याबाबत डॉक्टरांनी अपडेट दिली आहे.
आंदोलन काळात मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणस्थळी उपस्थित असणारे डॉ. चावरे यांनी त्यांच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. उपोषण सोडल्यानंतर जरांगेंना अॅम्ब्युलन्समधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं नेण्यात येत आहे. इथल्या गॅलॅक्सी रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? याबाबत सांगताना डॉक्टर म्हणाले की, मनोज जरांगे पाटलांचं सगल चार दिवस उपोषण झालेलं आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधी सलग ४८ तास त्यांचा प्रवास झालेला आहे. त्यामुळं तसं पाहिलं तर हे उपोषण सहा दिवसांचं झालेलं आहे.
सध्या त्यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासली तर ती कमी आहे. वीकनेस त्यांना बऱ्यापैकी आहे. त्यांची प्रकृती तशी नाजूकच आहे. यानंतर त्यांना संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करणार आहोत. त्यानंतर किमान दोन आठवडे त्यांना तिथं उपचार दिले जातील त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, असंही डॉक्टर चावरे यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.