jitendra awhad | eknath shinde sarkaranama
मुंबई

Jitendra Awhad : 'त्या' विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिन कसा साजरा करायचा? जितेंद्र आव्हाडांचा महायुती सरकारला सवाल

Jitendra Awhad On Mahayuti Government : एकीकडे देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाविना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 15 August : एकीकडे देशभरात आज 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र, दुसरीकडे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाविना स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागला आहे.

यामुळे आता शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले तरी देखील विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पोहोचला नसल्याचं उघडकीस आलं आहे. राज्य सरकारने दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्य पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी वेळेत न झाल्याने ऐन स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने स्थानिक महिला बचत गटांकडून गणवेश शिवून ते शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली.

मात्र, आता शाळा (School) सुरु होऊन दोन महिने झाले तरीही गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. काही शाळांचे अपवाद सोडता अनेक शाळांमध्ये विद्यार्थी गणवेशाविना शाळेत जात आहेत. अनेक ठिकाणी एकाच गटाला तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश शिवण्याचे काम दिल्यामुळे गणवेशाचे काम रखडले आहे. या सर्व गोंधळामुळे आणि योग्य नियोजनाच्या अभावामुळे आता राज्यातील हजारो विद्यार्थी गणवेशाविनाच ध्वजवंदनाला गेले आहेत.

शिवाय ज्या शाळांमध्ये गणवेश मिळाले आहेत त्या कापडाचा दर्जावरुन पालक आणि शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गणवेशाच्या मापातही गोंधळ असल्याचं समोर आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता जितेंद्र आव्हाड यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

आव्हाडांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यांत एकही शालेय गणवेश पोहचला नाही, झेंडावंदनला नवीन कपडे सुद्धा हे सरकार शालेय मुलांना देऊ शकले नाही, किती दुर्भाग्य आपले? कसा स्वातंत्र्यदिन त्यांनी साजरा करायचा?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तर जळगाव, लातूर, पालघर, सोलापूर, नागपूर, हिंगोली, पुणे, नगर, नाशिक, रायगड या जिल्ह्यांतील शिक्षकांनी सोमवारी सायंकाळपर्यंत गणवेश मिळाले नसल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे आता अनेक विद्यार्थ्यांना गणवेशाविनाच ध्वजारोहन करावं लागल्याचं आपलं दुर्भाग्य असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT