Eknath Shinde|
Eknath Shinde| 
मुंबई

Eknath Shinde news| एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर गर्दी कसली?

सरकारनामा ब्युरो

मुंंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर गेल्या तीन महिन्यात शिंदे गटाला राज्यभरातून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यातच आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका (BMC Election) तोंडावर असताना शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघील शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. वरळी मतदारसंघातूनच नाही तर संपूर्ण मुंबईतून शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.

शिंदे गटाच्या बंडाळीनंतर शिवसेनेतील कार्यकर्त्यांपासून ते खासदारापर्यंत हळूहळू सर्वचजण एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होताना दिसत आहेत. कार्यकर्त्यांपासून खासदारांपर्यंत शिंदे गटात प्रवेश करत असल्याने शिंदे गटाची ताकद हळुहळु वाढत चालली आहे. पण शिंदे गटात मेगाभरती होत असल्याचे दिसत आहे. पण याचा मोठा फटका हा शिवसेनेला आगामी मनपा निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एकीकडे एकनाथ शिंदेंच्या शासकीय निवास्थानाबाहेर मोठी गर्दी जमली असताना एकनाथ शिंदेंनी या गर्दीला संबोधित केलं. आई-वडिलांनंतर शिक्षकांचं आयुष्यात दुसरं स्थान असतं. शिक्षकांचे सर्व प्रश्न आपण सोडवणार आहोत. शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करणे आणि इतर विषय सोडवण्यासाठी आपण बैठकीत चर्चा करु, राज्य-सरकार तुमच्यासाठी सकारात्मक पावलं उचलत असल्याचं एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT