साहेब तुम्ही गेलात आणि ....; शिंदे गटाचं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र, पहा व्हिडीओ

Shivsena| Eknath Shinde| दसरा मेळाव्यावरून शिवसेना-शिंदे गटातील राजकारण दिवसेंदिवस चांगलचं तापत चाललं आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : दसरा मेळाव्यावरून शिवसेना-शिंदे गटातील राजकारण दिवसेंदिवस चांगलचं तापत चाललं आहे. शिवसेनेला शिवतीर्थावर आणि आणि शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा घेण्याची परवानगी मिळाली आहे. आता या दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. असे असतानाच दसऱ्याच्या तोंडावरच शिंदे गटाने दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी त्यांच्या फेसबुरवरुन एका व्हिडीओच्या स्वरुपात हे पत्र शेअर केलं आहे.

वाचा, काय म्हटलं आहे या पत्रात

“साहेब, तुम्ही गेलात आणि आपल्या शिवसनेच्या वाघाला कोण्या शिकाऱ्याने गुंगीचं इंजेक्शन दिलं. या गुंगीच्या इंजेक्शनचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला, शिवसेनेचा कणा हळूहळू मोडताना पाहून तुमच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील. हे आम्हाला सगळं दिसत होतं. पण उद्धवसाहेबांना आणि आदित्यला सांभाळू, या तुम्हाला दिलेल्या वचनामुळेच आम्ही शांत होतो. तुम्हाला ज्या विचारांची चीड होती, तेच विचार तत्व म्हणून आपल्या संघटनेत येऊ लागले. अनेकवेळा याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. पण आमचा आवाज दाबला जाऊ लागला.

Eknath Shinde
निष्ठा ठाकरेंसाठीच! एसटी कामगाराने रक्ताने लिहिले पत्र; अन्...

“रात्री जागून पोस्टर्स लावणाऱ्या, शिबीरं घेणाऱ्या, मराठी आणि हिंदू अस्मिता टिकवण्याकरत झटताना, पोलीस गुन्हे आणि दांडेही अंगावर घेणाऱ्या आम्हा कार्यकर्त्यांच्या एकाही शब्दाला किंमतच उरली नाही. हौशा-गौशांच्या नावापुढे बिरुदं लागून संघटनेत त्यांचं वजन वाढू लागलं आणि आपली संघटना भरकटू लागली. तुमच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या जुन्या जाणत्या शिवसेना नेत्यांनाही राजकारणातून बेदखल केलं गेलं. मग साहेबांच्या भेटीशिवाय परत जाण्याची वेळ शिवसैनिकांवर आली यात नवल ते काय?''

“ साहेब, तुम्ही होतात तेव्हा ‘मातोश्री म्हणजे आपुलकी’ हे समीकरणच होतं. तुम्ही कधीही खुर्चीचा मोह धरला नाही. पण तुम्ही गेलात आणि तुम्ही आयुष्यभर ज्यांच्याशी संघर्ष केलात, त्याच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचं संधान जुळलं. तुमच्या अटकेचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली. साहेब असं करू नका हे आम्ही त्यावेळीही धाय मोकलून सांगत होतो. पण आमचं ऐकून घेणारा कानच उरला नव्हता. हेच आमचं दुर्दैव. तरीही आपले साहेब मुख्यमंत्री झाले याचं समाधान आणि आता सुराज्य साकार होईल अशी आशा होती.”

“पण विपरीतच झालं, १९९२ साली दंगलीमध्ये तुम्ही होतात, म्हणून मुंबई वाचली. पण त्रिपुरामधल्या तथाकथित घटनेवरून अमरावतीत दंगल उसळली, तरीही शिवसेना शांतच. संभाजीनगरचं कायदेशीर नामांतर व्हावं, ही तुमचीच इच्छा होती. पण आपलं सरकार असूनसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होताना दिसेना. मुंबईच्या जीवावर उठलेल्या दाऊदचं मंत्र्यांशी असलेलं कनेक्शन सिद्ध झालं तरीही शिवसेना शांत होती” अशा शब्दांत शिंदे गटानं बाळासाहेब ठाकरेंना भावनिक पत्र लिहिलं आहे.

शिवसेना नेतृत्त्वाचा षंढासारखा थंडपणा तुम्हाला बघवला नसेल, मालमत्तेच्या वारसापेक्षा विचारांचा वारसा जास्त महत्वाचा असतो म्हणूनच आम्ही आपला वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी किती दिवस तुमचे विचार की आपल्या संघटेनेची गळचे पी मुकाट्याने सहन करण या द्वंदात आम्ही अडकून राहायंच, तुम्ही गेल्यावर शुवसेना नावाचा ढाण्या वाघ बघता बघता मॅटिनीशोच्या सरकशीतला वाघ झाला, महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या हक्काच्या जागा नाकारल्या जाऊ लागल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com