Rahul Narwekar News
Rahul Narwekar News  Sarkarnama
मुंबई

Rahul Narwekar News : 'डॅडीं'सारखं कार्यकर्त्यांना प्रेम देणार, मी गवळींच्या सेनेचा सदस्य; नार्वेकरांचे भाषण तुफान चर्चेत!

Chetan Zadpe

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 एप्रिल रोजी अखिल भारतीय सेना या पक्षाच्या मंचावरून केलेले भाषण चांगलेच चर्चेत आले आहे. नार्वेकर यांच्याकडून भायखळा येथे महायुतीचा जोरदार प्रचार केला जात आहे.'आपल्या रूपाने एक सदस्य अखिल भारतीय सेनेशी जुळला गेला, असे विधान केल्याने त्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच डॅडी (अरुण गवळी) यांच्याप्रमाणेच सेनेच्या कार्यकर्त्यांना प्रेम देईन, असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

अखिल भारतीय सेनेच्या मंचावरून त्यांनी सेनेचे नेते गीता गवळी यांच्या उपस्थितीत भाषण केले. नार्वेकरां सेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, "मी विधानसभा अध्यक्ष आहे. माझे अधिकार मला माहिती आहेत. मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (गँगस्टर अरुण गवळी) अ. भा. सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी (Lok Sabha) नाहीतर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील, असे भाषण नार्वेकरांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीचा उमेदवार नाही -

दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, 14 एप्रिल रोजी त्यांनी भायखळ्यातील हेरिटेज हॉटेलमध्ये घेतलेल्या प्रचार सभेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT