Harshvardhan Sapkal Sarkarnama
मुंबई

Baramati Bypoll : हर्षवर्धन सपकाळांची मोठी घोषणा : आज माघार घेतोय; पण 2029 मध्ये बारामतीत काँग्रेसचाच आमदार असेल...

Harshvardhan Sapkal Announcement : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली असली तरी 2029 मध्ये विजयाचा दावा करत हर्षवर्धन सपकाळ यांनी भविष्यातील राजकीय लढाईचे संकेत दिले आहेत.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 09 April : बारामती पोटनिवडणुकीच्या संदर्भात पहिल्यांदा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचाच फोन आला. दुसरा फोनही त्यांचाच होता. त्यानंतर इतरांचे फोन यायला सुरुवात झाली. राजकीय सभ्यता म्हणून आम्ही आज पोटनिवडणुकीतून माघार घेत असलो तरी २०२९ मध्ये बारामतीचा आमदार काँग्रेस पक्षाचाच राहील, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

बारामती (Baramati) पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.

हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) म्हणाले, बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मांडलेली भूमिका आमच्यापर्यंत आली नव्हती. मात्र, बारामतीच्या संदर्भात पहिला फोन हा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींचा आला होता. दुसरा फोनही त्यांचाच होता, त्यानंतर इतर नेतेमंडळींचे फोन यायला सुरुवात झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी काय प्रयत्न केले, हे मला माहिती नाही. पण, त्यांच्या खासदारांनी आमच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधायला पाहिजे होता, अशी अपेक्षा सपकाळ यांनी बोलून दाखवली.

ते म्हणाले, राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी समन्वयाची भूमिका खूप आधीपासून घ्यायला हवी होती. कारण १५ मार्चला निवडणुका लागल्या. तिथपासून पाच एप्रिलपर्यंत तब्बल २१ दिवस आम्हाला कोणाचाही फोन आलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एवढी मोठी मातब्बर मंडळी जे खासदार कायम दिल्लीत असतात. तसेच, काही मातब्बर मंत्र्यांनीही २१ दिवस ही भूमिका का मांडली नाही, हा आर्श्चयाचा विषय आहे.

आमची मोठी लढाई २०२९ मध्ये होणार आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीतून आम्ही माघार घेतली असली आगामी काळात पक्षाची लढाई आम्ही लढत राहू, असा निर्धार बारामतीच्या आमच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, आम्हाला आज दोन पावलं मागे घ्यावी लागत असली तरी आगामी २०२९ मध्ये बारामतीत काँग्रेस पक्षाचा आमदार राहील, अशी ग्वाही मी सर्वांना देतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT