Pune By Election: मोठी बातमी: बारामती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच आणखी तब्बल 43 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकांचा बिगूल वाजला

Grampanchyat By Election : भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमधील एकूण 43 रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यात 9 थेट सरपंच पदे आणि 34 सदस्य पदांचा समावेश आहे. निधन, राजीनामा व इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.
Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Google
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांचा शुभारंभ बुधवारी (ता.9 एप्रिल) झाला. भोर तहसील कार्यालयाच्या परिसरात उमेदवारी अर्ज खरेदी व दाखल करण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

भोर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमधील एकूण 43 रिक्त जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यात 9 थेट सरपंच पदे आणि 34 सदस्य पदांचा समावेश आहे. निधन, राजीनामा व इतर कारणांमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, 30 मार्च रोजी तहसीलदारांनी नोटीस प्रसिद्ध केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 7 ते 13 एप्रिलपर्यंत आहे. अर्जांची छाननी 15 एप्रिलला होईल, तर 17 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील. प्रत्यक्ष मतदान 28 एप्रिलला तर मतमोजणी व निकाल 29 एप्रिलला जाहीर केला जाईल.

या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने भोर तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विविध राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, गावागावात रणनीती आखली जात आहे. रिक्त जागांसाठी प्रबळ, सर्वसमावेशक आणि स्थानिक मुद्द्यांना बळकटी देणारे उमेदवार उभे करण्यावर सर्वांचा भर दिसून येत आहे.

Gram Panchayat Election
Pune NCP News: पुण्यात मोठी राजकीय घडामोड! राष्ट्रवादी लवकरच हादरणार? अजितदादांचा कट्टर समर्थक माजी आमदार भाजपच्या वाटेवर

या निवडणुकीच्या निमित्ताने भोरमध्ये पुन्हा एकदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे. मागील काही निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांच्यात असा रंगताना राजकीय संघर्ष पाहायला मिळाला होता.

थोपटे यांचा बालेकिल्ला मानला जाणारा भोर तालुका गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने थोपटे यांनी स्थानिक पातळीवरचे आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com