Uddhav Thackeray On BJP Alliance :  Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray On BJP : 'मी भाजपशी 'पॅचअप' करू शकलो असतो पण..' ; उद्धव ठाकरेंचं सूचक विधान !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेनेत घडलेल्या अभूतपुर्व फुटीनंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. यानंतर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भारतीय जनता पार्टीमधील (BJP) वितुष्ट दिवसेंदिवस वाढतच गेले. शिवसेना - भाजप युती तुटायला ठाकरे गटाने भाजपला जबाबदार धरले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शब्द फिरवल्याने महाविकास आघाडी करावी लागली, असे ठाकरे गटाकडून वारंवार सांगण्यात आले.

दुसरीकडून भाजपनेही ठाकरेंनी युती धर्म न पाळता पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे आणि भाजप पुन्हा कधी एकत्र येतील का? याबाबत अद्यापही चर्चा घडून येतात. यावर आता ठाकरे यांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे म्हणाले, "मी भाजपशी पॅचअप करू शकलो असतो, पण ते माझ्या नीतिमत्तेत बसत नाही.ज्यांनी आपल्याला 2014 पासून फसवलं. मातोश्रीमध्ये बंद दाराआड ठरलेला शब्द त्यांनी फिरवला, अशा लोकांसोबत कसे जाणार? मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना मी डांबून ठेवू शकत होतो, पण जे मनाने फुटले होते त्यांना डांबून काय करणार होतो ? त्यांना मी काय कमी केलं ?' असा सवाल ही ठाकरेंनी केला.

'शिवसेनेत इतकी वर्षे घालवलेले जुने निष्ठावंत जेव्हा पक्ष सोडून जातात त्याचे वाईट वाटते. तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता. संकटं येतात, संकटं जातात, अशा वेळीही मी खंबीर आहे. आपण पुन्हा सत्तेत येणारच आहोत. पण सत्ता मिळवण्यात माझा काही स्वार्थ नाही. मला निवडणूकही लढवायची नाही. तुम्ही निवडणूक लढता. निवडून येता. पक्ष-कार्यकर्ते तुम्हाला मोठे करतात आणि मग मोठे झाल्यावर तुम्ही पक्ष सोडून जाता?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT