Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut: मी विधिमंडळाचा अवमान केला नाही, उत्तर देणार पण...; हक्कभंगावर राऊत म्हणाले..

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics: हक्कभंग होईल असे काहीही विधान मी केलेले नाही. एका विशिष्ट गटापुरतं हे विधान मर्यादित होतं. त्यामुळे मी विधिमंडळाचा अवमान केला नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच हक्कभंगाबाबत नोटीस मिळाली त्यावेळी मुंबईत नव्हतो. या नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राऊत यांनी हक्कभंग समितीकडे केली आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "मला हक्कभंगाची नोटीस मिळाली. त्यावेळी मी मुंबईत नव्हतो. त्यामुळे मी उत्तर देऊ शकलो नाही. आता अधिवेशन सुरू झालेले आहे. विधिमंडळातल्या सहकाऱ्यांशी मी चर्चा करेन. नोटीसला कशा प्रकारे उत्तर द्यावे, त्याची काय प्रक्रिया आहे, ते पाहून त्या संदर्भात नक्की उत्तर देऊ. त्या विशिष्ट गटासंदर्भात तो शब्द वापरला. चोर हा अतिशय योग्य शब्द आहे. मी विधिमंडळाचा अवमान केला नाही."

यावेळी राऊत यांनी केंद्रासह राज्यसरकारवरही टीका केली. राऊत म्हणाले, "या देशातील परिस्थिती आणि राज्यातील परिस्थिती एकच आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल तर तुम्हाला देशद्रोही ठरवलं जातं. आम्ही घाबरत नाही. या लोकांनी अतिशय बेकायदेशीरपणे नाव आणि चिन्ह काढून घेतलं. तरी शिवसैनिक लढतो आहे. काल लालूप्रसाद यादव (Laluprasad Yadav) यांच्यावर धाडी पडल्या. पण गौतम अदानींना नोटीसही बजावली नाही. धाडी कोणावर टाकत आहेत तर विरोधी पक्षावर. जे चुकीचे आहे त्याच्या विरोधात आम्ही उभे राहणार."

राऊत यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विधानाचाही समाचार घेतला. राऊत म्हणाले, "मित्रांना भाजपनेच भांग पाजली का? महाराष्ट्रात भांग पिऊन कोण सत्तेवर आले? भांग उतरली की त्यांची सत्ता नक्कीच जाईल. आम्ही पूर्ण शुद्धीत आहोत. महाराष्ट्राची जनता किती शुद्धीत आहे, हे कसब्याच्या निवडणुकीवरून स्पष्ट झालं आहे. जे भांग पिऊन सत्तेवर बसलेले आहेत, त्यांना कळेल की महाराष्ट्र आणि राज्याची जनता काय आहे. त्यांची सगळी भांग कसब्यामध्ये उतरली आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT