Jayant Patil; धक्कादायक, परिचारीकांकडून दोनशे कोटी गोळा केले?

जिल्हा रुग्णालयांतील प्रशिक्षणार्थी परिचारीकांना कायम करण्यासाठी राज्यभरातून दोनशे ते तीनशे कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप.
Jayant Patil
Jayant PatilSarkarnama

मुंबई : (Mumbai) औषध (Medicine) खरेदी प्राधिकरण विधेयकावर चर्चा सुरु असताना शेतकरी कामगार पक्षाचे (आमदार जयंत पाटील (Jayant Patil) खळबळ उडवून दिली. राज्यातील परिचारीकांना (Nurces) कायम करण्यासाठी दोनशे ते तीनशे कोटी रुपये गोळा केले आहेत. ते कोणी गोळा केले? असा धक्कादायक प्रस्न करून त्याची चौकशी करून नाव सांगा अशी मागणी पाटील यांनी केली. (Concern minister should give statement in next week)

Jayant Patil
Nashik News: केंद्र सरकारला शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही!

राज्य शासनाच्या वैद्यकीय विभागाच्या रुग्णालयांना लागणारी औषधे व सर्जीकल साहित्याच्या खरेदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण निर्माण करण्याचे विधेयक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मांडले होते. त्यावरील चर्चेत आमदार पाटील यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

Jayant Patil
Dilip Bankar News: कांदा आंदोलन केल्यास निधी न देण्याची धमकी?

या चर्चेत भाग घेताना आमदार पाटील म्हणाले, काल माझ्याकडे रायगड जिल्हा रुग्णालयातील सुमारे शंभर परिचारीका भेटायला आल्या. त्या सर्व प्रशिक्षणार्थी होत्या. तीन वर्षाची सेवा झाल्याने त्यांना नोकरीत कायम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यांना कायम करण्यासाठी प्रत्येक परिचारीकेकडून पावणे तीन लाख रुपये घेण्यात आले आहेत.

या परिचारीकांनी आपल्या समस्या मांडल्या. तसेच राज्यभरात विविध जिल्हा शासकीय रुग्णालये आहेत. त्यातील सर्व परिचारीकांकडून सुमारे दोनशे ते तीनशे कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे कोणी घेतले?. कोणाकडे जमा झाले आहेत, याचा तपास करून योग्य ती कार्यवाही संबंधीत खात्याच्या मंत्र्यांनी करावी. पुढील आठवड्यात मला त्याची सर्व माहिती सादर करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com