Devendra Fadanvis on Delhi : Sarkarnama
मुंबई

Fadanvis On Cabinet Politics: 'माझी इच्छा महाराष्ट्रातच काम करण्याची; पण वरिष्ठांचा निर्णय अंतिम असेल...'

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Devendra Fadanvis On State Vs Cabinet Politics: राज्यात झालेल्या दुसऱ्या राजकीय भुकंपानंतर एकच खळबळ उडाली आहे.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहे. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळातही वर्णी लागू शकते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर ANI ला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं आहे.

२०२४ च्या निवडणुकीनंतर तुम्ही महाराष्ट्रात राहणार की दिल्लीत जाणार, या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मला तर महाराष्ट्रात राहण्याची इच्छा आहे. मी महाराष्ट्रात राहतो, इथे राजकारण करतो आणि महाराष्ट्राच्याच राजकारणात राहण्याची इच्छा आहे. पण मी ज्या विचारधारेचा आहे, त्यात आम्ही स्वत निर्णय घेऊ शकत नाही. इथे आमचे वरिष्ठ निर्णय घेतात, ते म्हणाले पक्षात काम करा मी तिथे काम करेल, ते म्हणाले विधानभवना काम करा मी तिथेही काम करेल, ते म्हणाले मुंबई काम करा, मी मुंबई काम करेल, दिल्लीत म्हणाले तर दिल्लीतही काम करेल आणि तामिळनाडूत काम करायला सांगितलं तर तिथेही काम करेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं, माझा निर्णय तर ते घेतील पण माझी महाराष्ट्राचच राजकारण करण्याची इच्छा आहे. (Maharashtra Politics)

गेल्या वर्षी ज्याप्रमाणे तुम्ही सत्ता आणली आता तुम्ही चाणक्य आहात का,या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, मी चाणक्य नाही पण जो मला धोका देतो, कपट करतो ते मी लक्षात ठेवतो.

यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांच्या (Elections) विषयावर बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गटामुळे रखडली असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला आहे. ठाकरे गटाने न्यायालयात याचिका केल्या आहेत. यातील एक आरक्षणाची याचिका असून त्या सर्व याचिका प्रलंबित आहेत. पण न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिल्याने महापालिकांच्या निवडणुका रखडल्या असल्याचा आहेत. पण आमच्यामुळेच पालिकेच्या निवडणुका रखडल्याचा आरोप ठाकरे गट करत आहे. पण ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत न्यायालय निवडणुकीचा मार्ग मोकळा करेल, असा विश्वास देवेंद्र फडणीस यांनी व्यक्त केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT