Maharashtra Political Crisis : 'सिल्वर ओक'वर शरद पवार यांची कायदेतज्ज्ञांशी खलबतं? नव्या नियुक्त्यांमुळे पेच...

Maharashtra Political Crisis Update : पक्षातील नव्या नियुक्त्यांमुळे पेच...
Maharashtra Political Crisis :  Sharad Pawar
Maharashtra Political Crisis : Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (AJit Pawar) यांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल सिल्वर ओक (Silver Oak) या आपल्या निवासस्थानी कायदेतज्ज्ञांनी चर्चा केली आहे. पक्षांत निर्माण झालेल्या पेचामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पवारांनी कायदेतज्ज्ञांनी खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Political Crisis :  Sharad Pawar
Bhagatsingh Koshyari On Maharashtra Politics : राजकीय भूकंपावर माजी राज्यपाल कोश्यारींची प्रतिक्रिया, "जैसे ज्याचे कर्म तसै.."

अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी पक्षातील नव्या नियुक्त्या केल्या आहेत. पक्षातील आधीच्या नियुक्त्या अजित पवारांकडून रद्द करण्यात आलेल्या आहेत. आता पुढे कोणते कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात, यातून मार्ग काढण्यासाठी यासंदर्भात कायदेतज्ज्ञ आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Political Crisis :  Sharad Pawar
Amol Kolhe Resignation : डॉ. अमोल कोल्हे राजीनामा देणार? शरद पवारांची भेट घेऊन..

अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार मुंबईत दाखल झाले आहेत. काल रात्री सिल्वर ओकवर नामांकीत वकील दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून नव्या नियुक्त्या आणि बडतर्फीचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामुळे आता मोठा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. यामुळेच आता शरद पवार यांनी कायदेशीर चाचपणीला सुरूवात केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com