Mumbai News Update : टोलनाका फोडल्यावरून सल्ले, उपदेश आणि इशाऱ्याच्या भाषेत बोलणाऱ्या भाजप नेत्यांच्या भूमिकेला भीक घालणार नसल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरेंनी भाजपलाच आव्हानच दिले. यापुढच्या काळात भाजपला भिडण्याचा सूरही त्यांनी ठेवला.अमित यांच्याआधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही भाजपला धारेवर धरलेच आहे. त्यामुळे टोलनाका फोडण्याच्या घटनेवरून भाजप आणि मनसेतील आरोप-प्रत्यारोपाचे राजकीय युध्द भडकण्याची शक्यता आहे.
मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्यानंतर भाजपने अमित ठाकरेंवर टीका-टीपण्णी करीत सल्ले आणि उपदेश दिले होते. त्याला मनसे अध्य़क्ष राज ठाकरेंनी उत्तर दिले आणि टोल वसुलीचा मुद्दा पुन्हा हाती घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. यावरून राज यांनी भाजपला सुनावलेही. त्यानंतर बळ आलेल्या अमित हे तर 'भीक घालणार नाही' असे सांगून भाजप नेत्यांवर घरसले.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणाच साधला आहे. भाजपने टोलमुक्त करण्याचं आश्वासनांचं दिलं होतं, त्याचं काय झालं, असा सवाल करत त्यांनी मी भाजपच्या टिकेला भीक घालणार नाही. मी सर्वसामान्य जनतेच्या मताला महत्त्व देतो. जर या घटनेच्या व्हिडिओखालील कमेंट पाहिल्या तर तुम्हाला स्वत:च उत्तर मिळून जाईल आणि लोक काय म्हणतात. हेही कळेल,असेही स्पष्ट केले.
अमित ठाकरे म्हणाले, 'काल एक ओला चालक भेटले ते म्हणाले, तुमच्यामुळे मला शिर्डीला जायला मिळालं चारशे नव्वद रुपये वाचले. म्हणाले मी शिर्डीच्या टोलनाक्याने गेलो. तेव्हा मला कळालं की जो टोल घेतला जातो, त्यात चारशे- पाचशे रुपये घेतात. हे खूप विचित्र आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. एकदा पुढच्या वर्षी राज साहेबांवर विश्वास ठेवून बघा. हा एकच सल्ला आणि एकच विनंती आहे.'
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.