Uddhav Thackeray| Election Commission
Uddhav Thackeray| Election Commission Sarkarnama

Thackeray ON Election Commission : 'आयोग शिवसेनेची आत्या लागत नाही, शिवसेना नाव माझ्या आजोबांनी दिलयं..

Maharashtra Politics : कोणीही उठून शिवसेना, शिवसेनाप्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्याने मारतील.'
Published on

Mumbai News : खासदार संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत घेतली. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेगटावर टीका केली. निवडणुक आयोगावर ठाकरेंनी हल्लाबोल केला.

शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह हे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. आयोगाच्या निर्णयावर ठाकरेंनी भाष्य केलं आहे. "शिवसेना हे नाव ठणठणीतपणे माझ्या आजोबांनी दिलेले आहे," असे त्यांनी आयोगाला पुन्हा दरडावून सांगितले.

Uddhav Thackeray| Election Commission
Chandrashekhar Bawankule on uddhav thackeray : मीच संपादक, माझाच मुलाखतकार, माझीच मुलाखत...भन्नाट!; बावनकुळेंनी ठाकरेंना झोडपले

शिवसेना नावावरुन विचारलेल्या प्रश्नाना ठाकरी भाषेत उत्तर दिले. ते म्हणाले, "'तो निवडणूक आयोगाचा अधिकार नाही. उद्या मी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचे नाव बदलले तर? हे बारसं त्यांनी नव्हते केले. निवडणूक आयोग शिवसेनेची आत्या लागत नाही. त्यांनी कानात येऊन नाव सांगितले नाही. शिवसेना हे नाव ठणठणीतपणे माझ्या आजोबांनी दिलेले आहे. आणि तेच नाव शिवसेनेप्रमुखांनी घेतले. म्हणूनच त्यांना शिवसेनाप्रमुख म्हणतात. कोणीही उठून शिवसेना, शिवसेनाप्रमुख व्हायला लागले तर लोक जोड्याने मारतील.'

Uddhav Thackeray| Election Commission
Sangli Drought News : पाणी द्या , अन्यथा कर्नाटकात जाणार.. ; जतमध्ये दुष्काळग्रस्तांचे उपोषण सुरु..

शिंदे गटाचे नेते आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही ठाकरेंच्या मुलाखतीवर निशाणा साधला आहे. शंभूराज देसाई यांनी विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, सामना सोडलं तर वन टू वन मुलाखत दुसऱ्या कुठल्या चॅनेलवर उद्धव ठाकरेंची झाली आहे का? खासदार संजय राऊत प्रश्न विचारतात आणि उद्धव ठाकरे उत्तरं देतात. म्हणजे अगोदर प्रश्न पत्रिका फुटली आणि मग उत्तर दिली. असा त्याचा अर्थ होतो.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com