Chhagan Bhulbal Comments on Sanjay Raut:  Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhulbal Comments on Sanjay Raut: 'त्या महान नेत्याबद्दल मी काहीही बोलणार नाही'; भुजबळांचा राऊतांना टोला

सरकारनामा ब्युरो

Loksabha Election 2024 : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने 2024 ला आमचे (ठाकरे गट) १९ खासदार लोकसभेसाठी उभे राहतील. २०१९ मध्ये जिंकलेल्या सर्व जागा आम्ही लढविणारच, असा दावा केला आहे. यावरुन आघाडीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ( I will not say anything about that great leader'; Bhujbal's attack on the Raut's )

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना विचारले असता, त्यांनी 'त्या महान नेत्याबद्दल मी काहीही बोलणार नाही,' असं म्हणत उत्तर देणं टाळलं आहे. पण तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसतील. प्रत्येक पक्षाचे नेते एकत्र बसून, कोण कुठून निवडणूक लढवणार यावर चर्चा होईल. यात मतभेद होतील पण, शरद पवार, उद्धव ठाकरे, दिल्लीचे काँग्रेस नेते यावर चर्चा करतील, असही भुजबळ यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut On Loksabha)

दरम्यान, लोकसभेच्या जागांवरुन महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतही या जागासाठी चढाओढ सुरु आहे. संजय राऊत(Sanjay Raut) हे आज (दि.१९) नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, आमचे २०२४ ला १९ खासदार लोकसभेत राहतील. २०१९ मध्ये जिंकलेल्या सर्व जागा लढविणारच आहे. लोकसभेच्या निवडणुकांसाठी कोणी किती जागा लढवाव्यात यावर प्राथमिक चर्चा सुरु आहे.

आघाडीत अद्याप १६ - १६ - १६ चा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. पण शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आघाडीच्या बैठकीत या अशा प्रस्तावावर कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येकी १६ जागा लढविण्याचा फॉर्म्युला ठरल्याचं मला माध्यमांमधूनच कळतंय. पण त्या बैठकीत फक्त बैठका कुणी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, सूत्र काय असावं यावर चर्चा झाल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT