Sharad Pawar Statement of Retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही.अशीही घोषणा त्यांनी केली आहे. ( 'I will retire from the post of President of NCP; Sharad Pawar's big announcement)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती'-भाग दोन या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन कार्यक्रम सुरु आहे. या आवृत्तीमध्ये त्यांनी त्यांच्या अनेक प्रवासाबद्दल लिहिलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला प्रचंड विरोध केला. (Sharad Pawar Latest News)
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी त्यांच्या पायाशी बसुन निर्णय़ मागे घेण्यासाठी गळ घालताना दिसत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह स्टेजवर सर्व नेत्यांनी चाहत्यांनी गर्दी कमी करण्याची विनंती करत आहेत. (Sharad Pawar Lok majhe sangati Latest news)
काय म्हणाले शरद पवार ?
मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.
पण कुठे थांबावं हे मला कळतं. मी निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रवादीची एक समिती नेमावी. प्रपुल्ल पटेल, सुनील तटकरे ., छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटली, धनंजय मुंडे, राजेश टोपे, . असतील, पक्षात कोणाला कोणतं काम करावं, कोणाला कोणतं पद द्यावं हे ठरवतील. असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच मी त्यानंतरही जनतेच्या सेवेत कायम राहिल. असही त्यांनी यावेळी नमुद केलं.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.