Mumbai : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन पार पडत आहे. यावेळी शरद पवार यांनी मोठी घोषणा केली.
आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, अशीही घोषणा त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
तसेच यावेळी राष्ट्रवादीचे काही नेते रडल्याचेही पाहायला मिळाले. तसेच यावेळी धनंजय मुंडे हे पवार साहेबांच्या पाया पडल्याचेही पहायला मिळाले.
शरद पवार हे निर्णय मागे घेत नाहीत, तोपर्यंत सभागृह न सोडण्याची कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली आहे. तसेच सुनील तटकरे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन केले आहे. यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना अश्रू अनावर झाले. तसेच पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी साकडे घालण्यात येत आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.